पासधारकांनाच मिळणार सिद्धेश्वरांचे दर्शन; ६८ लिंगांना तैलाभिषेक

महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश व तेलंगणातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेले ग्रामदैवत शिवयोगी श्री सिध्दरामेश्वरांच्या यात्रेस (Shri Siddheshwar Yatra) बुधवारी ६८ लिंगांच्या तैलाभिषेकाने (यण्णीमज्जन) प्रारंभ करण्यात आला.

  सोलापूर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश व तेलंगणातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेले ग्रामदैवत शिवयोगी श्री सिध्दरामेश्वरांच्या यात्रेस (Shri Siddheshwar Yatra) बुधवारी ६८ लिंगांच्या तैलाभिषेकाने (यण्णीमज्जन) प्रारंभ करण्यात आला. गतवर्षीप्रमाणे यंदाही निर्बंध असल्याने पुजारी, मानकरी, नंदीध्वजधारक या ५० जणांच्या उपस्थितीत धार्मिक विधी पार पडणार असले तरी दर तासाला पासधारक ५०० भाविकांना मंदिरात दर्शनासाठी (Darshan of Siddheshwar) सोडले जाणार आहे.

  सलग दुसऱ्या वर्षी कोरोना संसर्गाचे सावट असल्यामुळे मानाच्या नंदीध्वजांची मिरवणूक निघणार नाही. दरवर्षीप्रमाणे श्री सिध्देश्वर मंदिर परिसरातील अमृतलिंगास योगदंडाच्या साक्षीने हळद-तेल, अक्षता व विडा अर्पण करून मानकरी तैलाभिषेक करण्यात आला. मंदिरात श्रींच्या मानकी गदगीस व श्री सिध्देश्वरांच्या योगसमाधीस भक्तिभावाने तैलाभिषेक करण्यात आला. त्यानंतर योगदंडासमवेत मानाच्या सात नंदीध्वजांचा प्रत्येकी एक मानकरी वाहनातून शहराच्या पंचक्रोशीतील ६८ लिंगांच्या तैलाभिषेकाला जाण्यास प्रशासनाने परवानगी दिली आहे.

  कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने घातलेल्या निर्बंधाला अनुसरून ही यात्रा पार पडत आहे. मंदिरात दर्शनासाठी ऑनलाइन पासची सुविधा श्री सिध्देश्वर देवस्थान पंचकमिटीने उपलब्ध केली आहे. सकाळी ६ ते रात्री ९ ही वेळ निवडून भाविकांना ऑनलाइन दर्शनाचा पास मिळवता येईल. यासाठी भाविकांना http:// www.shrisiddheshwardevasthan. com संकेतस्थळावर नोंदणी करता येईल. दर तासाला ५०० पासधारकांना मंदिरात दर्शनासाठी सोडण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. १८ ते ६५ वयोगटातील भक्तांना ऑनलाइन पास मिळू शकेल.

  वाहतूक मार्गात बदल

  – सिद्धरामेश्वरांच्या यात्रेनिमित्त १२ ते १७ जानेवारीपर्यंत वाहतूक मार्गात बदल करण्याचा आदेश शहर वाहतूक नियंत्रण शाखेने दिला आहे.

  – श्री विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे  बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते  आपत्कालीन मार्केट पोलीस चौकी ते धूमाळ रसपान ग्रह वाहतुकीसाठी मार्ग बंद राहणार आहे. त्याऐवजी वाहनधारकांनी पोलीस डफरीन चौक, हरिभाई देवकरण या मार्गाचा ज्ञानप्रबोधीनी प्रशाला ते रंगभवन हा पर्यायी मार्ग फडकुले सभागृह पर्यंत मार्ग बंद राहणार आहे.

  – पंचकट्टा ते मार्केट हरिभाई देवकरण प्रशाला मार्ग क्रमांक एक बंद राहणार विजापूर वेस, बेगम पेठ चौकी, पूनम गेट, रंगभवन वापर करावा.

  – ग्रामदैवत श्री सिध्देश्वर यात्रेनिमित्त १२ ते १६ जानेवारी या कालावधीत श्री सिध्देश्वर मंदिर, श्री मल्लिकार्जुन मंदिर, संमती कट्टा परिसर या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रम व होम मैदान येथे १४ रोजी होमविधी सोहळा होणार आहे. त्यामुळे १२ ते १६ जानेवारी या कालावधीत हा परिसर नो पार्किंग झोन घोषित करण्याचा आदेश पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी दिला आहे.