… अन्यथा पेट्रोल डिझेल सह तुमच्या सेवा थांबणार जिल्हाधिकारी यांचे आदेश

जर एखाद्या व्यक्तीकडे प्रमाणपञ नसेल. तर त्याच्या कुटुंबातील एखाद्याने लसीचे दोन डोस घेतलेले असतील तर त्यांना सेवा दिली जाईल ओमिक्रॉन संसर्गाला रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून आता शासन निर्देशानुसार विशेष पथकाकडून पुन्हा एकदा लसीकरण नसलेल्या आणि नियम मोडणाऱ्या लोकांविरुद्ध कारवाई मोहीम जोमाने सुरू करण्यात आली आहे.

    सोलापूर  :  ज्या व्यक्तीनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली नाही त्यांचे पेट्रोल डिझेलसह सार्वजनीक सेवा थांबविण्याचा आदेश जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी दिला आहे. ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. लसीकरण मोहीम अधिक व्यापकपणे राबविण्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले. कोरोना लसीचे दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र नाही, अशा लोकांना सार्वजनिक सेवांपासून वंचित ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला.

    गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीस आरोग्य, पोलीस प्रशासनासह इतर अधिकारी उपस्थित होते.
    रेशन दुकान, पेट्रोल पंप, विविध प्रकारची दुकाने, प्रवासी वाहतूक करणारी वाहने अशा आस्थापनांची तातडीने तपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. रेशनच्या धान्याठी येणाऱ्या व्यक्तीने कोरोना लस घेऊन १४ दिवस पूर्ण झालेले असावेत. शिवाय त्याचे प्रमाणपत्रही असावे. खासगी प्रवासी सेवेस मज्जाव सेवा थांबविण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या आहेत.

    जर एखाद्या व्यक्तीकडे प्रमाणपञ नसेल. तर त्याच्या कुटुंबातील एखाद्याने लसीचे दोन डोस घेतलेले असतील तर त्यांना सेवा दिली जाईल
    ओमिक्रॉन संसर्गाला रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून आता शासन निर्देशानुसार विशेष पथकाकडून पुन्हा एकदा लसीकरण नसलेल्या आणि नियम मोडणाऱ्या लोकांविरुद्ध कारवाई मोहीम जोमाने सुरू करण्यात आली आहे. विविध ठिकाणी लसीकरण झाले आहे की नाही याची तपासणी, विना मास्क, रस्त्यावर घाण टाकणे, थुंकणे, सोशल डिस्टंसिंग न पाळणे, दोन्ही लसीकरण करून न घेता दुकाने सुरू ठेवणे यासह इतर विविध नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी झोन कार्यालयातील पथकांसह महापालिकेच्या मुख्य सफाई कार्यालय अंतर्गत पथके तैनात करण्यात आली आहेत. ही कारवाई मोहीम यापुढे आणखी तीव्र करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

    वाहतूक करणारे ड्रायव्हर आणि प्रवासी यांच्याकडील कोरोना लसीकरणाची माहिती पोलीस प्रशासनाकडून घेतली जाणार आहे. पेट्रोल पंपावरदेखील प्रमाणपत्रा शिवाय पेट्रोल मिळणार नाही. पोलीस आरोग्य विभागाचे पथक संयुक्तपणे नागरिकांनी कोरोना लस घेतले का? याबाबतची तपासणी करण्यात करणार आहेत.