एमआयएमच्या ओवेसींना सोलापूर पोलिसांचा २०० रूपयांचा दंड

एम.आय.एम. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांची मंगळवारी हुतात्मा स्मृती मंदिरात सभा होती.ओवेसी हे सोलापूरात आल्यानंतर सातरस्ता येथील शासकीय विश्रामगृहात गेले.त्या ठिकाणी बंदोबस्तास असलेले शहर वाहतुक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी ओवेसी यांच्या गाडीला नंबरप्लेट नसल्याचे पाहिले होते

    सोलापूर:  ऑल इंडिया मजलीस ए इत्तेहाद ए मुस्लिमीनचे (एम.आय.एम.आय.एम.) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांची नंबर प्लेट नसलेली गाडी शासकीय विश्रामगृहात आल्यानंतर शहर वाहतुक शाखेच्या पोलिसांनी गाडी अडवून 200 रूपयाचा दंड ठोठावला.त्यामुळे सोलापूरात कायद्याचे राज्य आहे, अशी चर्चा शहरात सुरू आहे.

    एम.आय.एम. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांची मंगळवारी हुतात्मा स्मृती मंदिरात सभा होती.ओवेसी हे सोलापूरात आल्यानंतर सातरस्ता येथील शासकीय विश्रामगृहात गेले.त्या ठिकाणी बंदोबस्तास असलेले शहर वाहतुक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी ओवेसी यांच्या गाडीला नंबरप्लेट नसल्याचे पाहिले होते. त्यानंतर ओवेसी हे हुतात्माकडे जात असताना शहर वाहतुक शाखेच्या पोलिसांनी ओवेसी यांची गाडी अडविली व गाडीला नंबरप्लेट असल्याशिवाय सभेच्या ठिकाणी जाता येणार नाही, असे सांगितले

    त्यामुळे एम.आय.एम.च्या स्थानिक नेत्यांंनी शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांना 200 रूपयाचा दंड भरून वाद वाढवू दिला नाही व ओवेसी यांच्या गाडीत असलेली नंबरप्लेट बसविली.यावेळी शहर वाहतुक शाखेच्या पोलिसांनी, एम.आय.एम.च्या शहरातील पदाधिकार्‍यांना सांगितले की, सोलापूरात कायद्याचे राज्य आहे.येथे सारे काही नियमांनेच चालेल असं बजाविण्यात आले. तेव्हा शहर वाहतुक शाखेच्या पोलिसांनी शासकीय विश्रामगृहातून ओवेसी यांची गाडी सोडली.त्यानंतर ओवेसी हे हुतात्माकडे रवाना झाले.