संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

शनिवारी बारावीचा अर्थशास्त्राचा पेपर होता. आम्ही तालुक्यातील शाळांना मिटिंगमध्ये सांगितले आहे की, पेपर तीनला आहे. दुपारी अडीचला आत घ्या. त्यानंतर 2.50 पर्यंत प्रश्नपत्रिका हातात द्या व सायंकाळी साडेसहापर्यंत पेपर संपवा, असे शासनाचे वेळापत्रक आहे.

  अकलुज / कृष्णा लावंड : शंकरनगर, अकलुज येथील महषीँ प्रशाला येथे बारावी आर्ट्स विभागाचा आज (दि.19) अर्थशास्त्राचा पेपर होता. याची नियोजित वेळ दुपारी तीन ते सायंकाळी साडेसहा अशी होती. मात्र, महषीँ प्रशालेच्या मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना ग्रुपवर मेसेज टाकून ‘दोनलाच शाळेत या’ असे सांगितले.

  त्याप्रमाणे विद्यार्थीही दुपारी दोनला प्रशालेत हजर झाले. त्यानंतर अडीचला प्रश्नपत्रिका देण्यात आली आणि सर्व विद्यार्थ्यांना सायंकाळी सहाच्या आतच बाहेर सोडण्यात आले. तरी पालकांना असे का परीक्षेचे बदल केलेले माहीत नाही.

  दरम्यान, या प्रकारानंतर पालकांमध्ये संशय असून, प्रशालेतील सीसीटीव्ही फुटेज तपासून ताब्यात घ्यावेत व मुख्याध्यापकांना निलंबित करावे, अशी मागणी केली जात आहे.

  साडेसहापर्यंत पेपर संपविण्याचे बोर्डाचे वेळापत्रक

  शनिवारी बारावीचा अर्थशास्त्राचा पेपर होता. आम्ही तालुक्यातील शाळांना मिटिंगमध्ये सांगितले आहे की, पेपर तीनला आहे. दुपारी अडीचला आत घ्या. त्यानंतर 2.50 पर्यंत प्रश्नपत्रिका हातात द्या व सायंकाळी साडेसहापर्यंत पेपर संपवा, असे शासनाचे वेळापत्रक आहे.

  – धनंजय देशमुख, तालुका शिक्षणाधिकारी, माळशिरस.