ग्रामीण भागातील लोकांनी लसीकरण करून घ्यावे : जिल्हाधिकारी

ग्रामीण भागातील लोकांनी लसीकरण (Vaccination) करून घ्यावे असे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर (Milind Shambharkar) यांनी माळशिरस तालुक्यातील दौऱ्यावेळी केले. सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी माळशिरस तालुक्यामधील माळीनगर आरोग्य उपकेंद्र अंतर्गत कोंडबावी, चाकोरे, आनंद नगर येथील लसीकरण करणाऱ्या टीमसोबत पूर्ण दिवस व्यतीत केला.

    अकलूज : ग्रामीण भागातील लोकांनी लसीकरण (Vaccination) करून घ्यावे असे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर (Milind Shambharkar) यांनी माळशिरस तालुक्यातील दौऱ्यावेळी केले. सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी माळशिरस तालुक्यामधील माळीनगर आरोग्य उपकेंद्र अंतर्गत कोंडबावी, चाकोरे, आनंद नगर येथील लसीकरण करणाऱ्या टीमसोबत पूर्ण दिवस व्यतीत केला.

    यावेळी उसाच्या फडात लसीकरण चालू असलेल्या ठिकाणी जाऊन त्यांनी मार्गदर्शन व सूचना दिल्या आहेत. तसेच तालुक्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी व उपस्थित पदाधिकारी यांच्याशी चर्चा केली. यामुळे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचा उत्साह द्विगुणित झाला. जिल्ह्याच्या प्रशासकीय प्रमुखांनी वर्षाचा महत्त्वाचा पहिला पूर्ण दिवस लसीकरणासाठी दिल्यामुळे सर्वांच्या मनात लसीकरणाविषयी चे महत्त्व पटले आहे. यापुढे सर्व कर्मचारी जोमाने काम करून उर्वरित उद्दिष्ट पूर्ण करतील यासाठी त्यांचा दौरा प्रेरणादायक ठरेल, असे तालुका वैद्यकीय अधिकारी रामचंद्र मोहिते यांनी सांगितले.

    यावेळेस वैद्यकीय अधिकारी संकल्प जाधव, तहसीलदार जगदीश निंबाळकर, गटविकास अधिकारी शिवाजी पाटील, कोंडबावी माजी सरपंच विष्णू घाडगे, सरपंच प्रियंका शिंदे, उपसरपंच वर्षा माने, पोलिस पाटील सचिन माने, ग्रामसेविका करंजकर, आरोग्य अधिकारी दादासाहेब फुंदे सर्व लसीकरण कर्मचारी टीम, ग्रामपंचायत पदाधिकारी, शिक्षक कर्मचारी उपस्थित होते.