मावा विक्री ठिकाणी पोलीसांचा छापा ; दीड लाखाचा मुद्देमाल जप्त

सोमवारी पोलीस आयुक्तालय हद्दीत अवैध धंद्यांवर कारवाई करीत गस्त घालत असताना पोलीसांना गुप्त बातमीदारामार्फत युनुरा मटन स्टॉल जवळ गाझी मोहल्ला बक्षी गल्ली पंजाब तालीम जवळ उत्तर कसबा सोलापूर येथे एका घराममध्ये तंबाखुजन्य पदार्थ,मावा असल्याची माहिती मिळाली होती.

    सोलापूर : मावा बनवून विक्री करताना पोलिसांनी छापा टाकून कारवाई करीत दीड लाखाचा मुद्देमाल जप्त केल्याची घटना दि.२७ डिसेंबर रोजी घडली.आसिफ इशाद मुजावर (वय-३५,९४/०५ नवीन विडी घरकुल,अक्कलकोट रोड,सोलापूर) हा तंबाखुजन्य पदार्थ,सुपारी,मावा व इतर साहित्य मिक्स करून मावा तयार करीत असताना एकुण १,५०,६०० रुपयांचा माल मिळुन आला असून,त्याला ताब्यात घेऊन माल जप्त करण्यात आला.

    सोमवारी पोलीस आयुक्तालय हद्दीत अवैध धंद्यांवर कारवाई करीत गस्त घालत असताना पोलीसांना गुप्त बातमीदारामार्फत युनुरा मटन स्टॉल जवळ गाझी मोहल्ला बक्षी गल्ली पंजाब तालीम जवळ उत्तर कसबा सोलापूर येथे एका घराममध्ये तंबाखुजन्य पदार्थ,मावा असल्याची माहिती मिळाली होती.त्या अनुषंगाने त्याठिकाणी दोन पंचासमक्ष छापा टाकला.त्यावेळी मुजावर हा मावा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य मिक्स करत असताना मिळून आला.दम्यान पोलीसांनी हि माहिती लगेचच अन्न व औषध प्रशासन कार्यालय येथील अधिकाऱ्यांना सांगितले. त्यावेळी अन्नपुरवठा निरीक्षक यांनी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.हि कामगिरी पोलीस आयुक्त हरीष वैजल यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि जीवन निरगुडे,पोह दिलीप गालशंकर,पोना योगेश बड़े,पोना वाजीद पटेल,पोका संजय साळुंखे,चालक पोकों नरेंद्र नक्का यांनी केलेली आहे.