शेवटची मंगलाष्टका संपताच पोलिस पोहोचले मंडपात अन्…

शेवटची मंगलाष्टका संपताच तिथे पोलिस पोहोचले आणि मग काय थेट लग्नाच्या स्टेजवरील मंडळीची वारी माढा पोलिस ठाण्यात पोहोचली. ही कहाणी आहे माढा तालुक्यातील भुताष्टे गावात घडलेल्या या बालविवाहाची.

    माढा : शेवटची मंगलाष्टका संपताच तिथे पोलिस पोहोचले आणि मग काय थेट लग्नाच्या स्टेजवरील मंडळीची वारी माढा पोलिस ठाण्यात पोहोचली. ही कहाणी आहे माढा तालुक्यातील भुताष्टे गावात घडलेल्या या बालविवाहाची.

    २७ डिसेंबर दुपारी १२.३० च्या सुमारास गावात घडलेल्या या बालविवाह प्रकरणी गावचे पोलिस पाटील सतीश यादव यांनी पोलिसांत फिर्याद दिल्यानुसार १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला बालसुधारगृहात पाठवले. तर नवरदेव सज्जन गजेंद्र बेरड, नवरदेवची आई विमल गजेंद्र बरेड, सविता जनार्धन शिंदे (रा. हाडगाव ता.निलंगा जि. लातूर) या तिघाविरोधात बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.

    अल्पवयीन मुलीच्या आईने आपल्या १३ वर्ष ७ महिन्याच्या मुलीचे लग्न भुताष्टेतील विमल बेरड या तरुणाबरोबर लग्नासाठी १८ वर्षे पूर्ण असावे लागते हे माहिती असताना देखील लग्न लावून दिले, अशी फिर्याद सतिश यादव यांनी पोलिसांत दिली. मुलीचे वय १८ ऐवजी २१ करण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून अंतिम टप्यात असतानाच दुसरीकडे मात्र वाढते.

    बालविवाह वाढत असताना दिसताहेत. यासाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन जनजागृतीही करणे तितकेच गरजेचे आहे. कुठे बालविवाह होताना निदर्शनाला आल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन सहाय्यक पोलिस निरीक्षक शाम बुवा यांनी केले आहे.

    भटजीकडून पाहणी होणे गरजेचे

    लग्न लावण्यात महत्वाची भूमिका बजावत मोठे साक्षीदार असणाऱे भटजी असतात. त्यांनी देखील लग्न विधी करताना नवरी, नवरदेवाचे वयाचे पुरावे पाहणे तितकेच गरजेचे आहे. भटजींनी जरी सतर्कता बाळगली तर गुपचूप होणाऱ्या बालविवाहाच्या घटनांवर निश्चितच आळा बसेल.

    लग्न समारंभाचा व्हिडिओ, फोटो पोलिसांकडे

    भुताष्टे गावात सुरु असलेल्या बालविवाहाचा फोटो, व्हिडिओ एकाने काढला आणि तो थेट माढा पोलिसांच्या मोबाईलमध्ये आला. माहिती समजताच सहाय्यक पोलिस निरीक्षक शाम बुवा यांनी तातडीने पोलिस उपनिरीक्षक किरण घोंगडे, चंद्रकात गोरे, प्रविण दराडे, सागर कौलगे या पोलिसांचे पथक गावचे पाटील सतिश यादव यांना घेऊन थेट लग्न मंडपातच पोहोचताच शेवटची मंगल अष्टका झाली आणि मग काय स्टेजवरुनच नवरी नवरदेवासह त्यांच्या कुटुंबियांना पोलिसांनी ताब्यात घेतले.