११ ग्रामपंचायतीवर समविचारी पँनलचा राजकिय झेंडा

गुंजेगाव येथे भालके -अवताडे पुरस्कृत गटाने सत्ता मिळवली शिरनांदगी येथे मायाका थोरबोले या यांना दुसऱ्यांदा सरपंच होण्याचा मान मिळाला आहे डोंगरगाव येथे झालेल्या पंचरंगी लढतीत सारिका खिलारे या विजयी झाल्या हाजापूर येथे पाच सदस्य यापूर्वी बिनविरोध झाले होते दोन सदस्य व एका सरपंच पदाच्या निवडीत माधवानंद आकळे यांच्या नेतृत्वाखाली मैना देवकुळे या विजयी झाल्या. तेथे समविचारी गटाच्या रोहिणी हेंबाडे विजयी झाल्या गुंजेगाव येथे अवताडे भालके युतीतून विमल चौगुले,या तर खोमनाळ येथे बायडाबाई मदने विजयी झाल्या.

  मंगळवेढा : तालुक्यातील ग्रामपंचायत निकालावर समविचारी गटाचे वर्चस्व राहिले आहे गावगाड्यातील सत्तेसाठी अनेकांनी आपल्या सोयीची आघाडी करत समविचारी नाव दिले. खोमनाळ व गुंजेगाव येथील उमेदवाराला समान मते पडल्याने त्यांना चिठ्ठीवर विजयी घोषित करण्यात आले

  तालुक्यातील 16 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची मतमोजणी आज शासकीय गोदामात तहसीलदार स्वप्निल रावडे यांच्या अधिकारात सुरू करण्यात आली करण्यात आले 11 टेबलवर दोन फेऱ्यात हि मतमोजणी करण्यात आली पहिल्या फेरीमध्ये येड्राव, गोणेवाडी, तळसंगी, शिरनांदगी, पाटकळ, गुंजेगाव, खोमनाळ, मारापुर, डोंगरगाव, सोड्डी, पौट, ग्रामपंचायत ची मतमोजणी करण्यात आली तर दुसऱ्या फेरीमध्ये ढवळस, बावची, भालेवाडी, मारोळी, राजापूर या ग्रामपंचायतीची मतमोजणी करण्यात आली.

  खोमनाळ येथ कल्पना पवार आणि अश्विनी सुळकुंडे या महिलेंना समान मतदान(227) पडल्यामुळे चिठ्ठीवर कल्पना पवार या विजयी झाल्या तशाच प्रकार गुंजेगाव येथे झाला राहुल खांडेकर व पांडुरंग ढोणे यांना समान मतदान(311) तर त्या चिठ्ठीवर राहुल खांडेकर यांना विजयी घोषित करण्यात आले. दामाजी कारखान्याच्या निवडणुकीपासून तालुक्यामध्ये भालके व परिचारक यांच्या कार्यकर्त्यांमध्ये युती होत समविचारी गटाची स्थापना सुरुवात करण्यात आली आणि तोच पॅटर्न या ग्रामपंचायत निवडणुकीत करण्यात आला काही ठिकाणी अवतार आ समाधान आवताडे यांच्या गटाने भारत भालके गटाबरोबर युती केली तर भालके गटाने काही ठिकाणी परिचारक गटाबरोबर येथे केले तर काही ठिकाणी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर अवताडे यांच्या गटाबरोबर देखील इथे करत गावगाड्यातील सत्तेसाठी नवा समविचार या निवडणुकीच्या निमित्ताने रुजवण्यात आला निकालानंतर सर्वच गटांनी तालुक्यातील सर्वच नेत्याच्या कार्यालयालाला भेट देऊन त्यांच्याकडून सत्कार स्वीकारत आम्ही तुमचेच आहोत असे दाखवण्याचा प्रयत्न केला.

  तालुक्यातील राजकीय दृष्ट्या प्रतिष्ठेचे आणि लक्षवेधक ठरलेल्या तळसंगी ग्रामपंचायत निवडणुकीत दामाजी कारखान्याचे अध्यक्ष शिवानंद पाटील यांच्या गटाचे वर्चस्व प्रस्थापित कायम राहिले असून सरपंच पदाच्या उमेदवार 268 मतांनी विजयी झाल्या. याशिवाय भालेवाडी येथे समविचारीचे वर्चस्व कायम राहिले ही येड्राव येथे माजी सभापती उपसभापती काशिनाथ पाटील यांच्या गटाचे वर्चस्व राहिले. संजय पाटील सरपंच पदी विजयी झाले गोणेवाडी येथे रामेश्वर मासाळच्या समविचारीचे वर्चस्व राहिले ठिकाणी संगीता मासाळ.बावची येथे आ समाधान आवताडे यांच्या गटाला सत्ता गमवावी लागली त्या ठिकाणी भालके परिचारक पुरस्कृत सर्वच सदस्य विजयी झाले सरपंच पदी दशरथ गाढवे विजयी झाले मारोळी येथे दामाजीचे संचालक बसवराज पाटील यांच्या नेतृत्वाखालील सर्व सदस्य मोठ्या फरकाने विजयी झाले.

  राजकुमार पाटील सरपंच पदासाठी विजयी झाले सोड्डीत यादप्पा माळी गटाचे पाच सदस्य विजयी होत गड आला पण सिंह गेला अशी अवस्था झाली मात्र त्यांना थेट सरपंचामुळे सरपंच पद गमवावे लागले त्या ठिकाणी आ. समाधान आवताडे यांच्या गटाचे शांतप्पा बिराजदार यांच्या नेतृत्वाखाली गटाने सत्ता मिळवली पाटकळ येथे सरपंच पदासाठी आठ अर्ज आखाड्यात होते भालके व सिद्धेश्वर अवताडे यांच्या गटाने सत्ता ऋतुराज बिले हे सरपंच पदी विराजमान झाले मारापुर येथे आमदार अवताडे समर्थक विनायक यादव विजयी झाले.

  गुंजेगाव येथे भालके -अवताडे पुरस्कृत गटाने सत्ता मिळवली शिरनांदगी येथे मायाका थोरबोले या यांना दुसऱ्यांदा सरपंच होण्याचा मान मिळाला आहे डोंगरगाव येथे झालेल्या पंचरंगी लढतीत सारिका खिलारे या विजयी झाल्या हाजापूर येथे पाच सदस्य यापूर्वी बिनविरोध झाले होते दोन सदस्य व एका सरपंच पदाच्या निवडीत माधवानंद आकळे यांच्या नेतृत्वाखाली मैना देवकुळे या विजयी झाल्या. तेथे समविचारी गटाच्या रोहिणी हेंबाडे विजयी झाल्या गुंजेगाव येथे अवताडे भालके युतीतून विमल चौगुले,या तर खोमनाळ येथे बायडाबाई मदने विजयी झाल्या.निकालानंतर आ अवताडे गटाने दहा ग्रामपंचायती तर भालके गटाने 10 ग्रामपंचायती जिंकल्याचा दावा केला..परिचारक गटाने देखील आम्ही तालुक्यात नंबर वन असल्याचा दावा केला. परंतु या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल झाले त्यामुळे अनेकांना जिंकण्यासाठी आपली संपत्ती गहाण ठेवण्याची वेळ आली.

  मतमोजणी दरम्यान पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी विजयी व पराभूत उमेदवारांना शांततेचे आवाहन करत हुल्लडबाजी व दंगामस्ती केल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा देखील देण्यात आला.