
मये मतदारसंघातून प्रेमेंद्र शेट आमदार म्हणून निवडून आले आणि त्यांनी आमदार झाल्याचा आनंद व्यक्त करणारा आणि आभार व्यक्त करणारा पहिला फोन मात्र त्यांच्या मतदारसंघाची प्रभारी म्हणून कौशल्य पणाला लावणाऱ्या अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना केला.
अक्कलकोट : मये मतदारसंघातून प्रेमेंद्र शेट आमदार म्हणून निवडून आले आणि त्यांनी आमदार झाल्याचा आनंद व्यक्त करणारा आणि आभार व्यक्त करणारा पहिला फोन मात्र त्यांच्या मतदारसंघाची प्रभारी म्हणून कौशल्य पणाला लावणाऱ्या अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना केला.
गोवा विधानसभा निवडणुकीचे मुख्य प्रभारी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मये विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी आपले विश्वासू सहकारी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यावर सोपविली होती. आपल्या कल्पक नेतृत्वाची आणि व्युव्हरचनेची चुणूक दाखवीत आपल्या पक्षाचे उमेदवार प्रेमेन्द्र शेट यांचा विजय रथ 3136 मताधिक्याने किनारी पोचविण्यासाठी अतिशय महत्वपुर्ण भूमिका बजावली. त्यामुळे गोव्यातील मये मतदार संघाचे भाजप पदाधिकरी व कार्यकर्ते हे अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी व त्यांचे 40 जणांची तरुण पदाधिकारी फळी यांच्यावर कमालीचे खुश होऊन कौतुकाचा वर्षाव करीत आहेत.
आमदार कल्याणशेट्टी यांच्यावर मयेची जबाबदारी आल्यानंतर निवडणूक जाहीर होण्यापूर्वी एक महिन्यापासून संपूर्ण निवडणूक होईपर्यंत अनेक वेळा गोव्याला गेले. तिथली प्रचार यंत्रणा स्थानिकांना सोबत घेत व्यवस्थित हाताळली. झालेल्या एकूण मतदान 25488 यांपैकी विजयी प्रेमेंद्र शेट यांना 7874 तर पराभुतात प्रवीण झांट्ये 3424,संतोष सावंत 4738, राजेश कलंगुटकर 2084, श्रीकृष्ण परब 3974 तर मिलिंद पिळगांवकर 2316 अशी मते वरील उमेदवारांना मिळालेली आहेत.
अक्कलकोट आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी त्यांच्याकडे असलेले अनुभव माझ्यासाठी पणाला लावले. पक्ष पदाधिकरी यांना निवडणूक लढवायची आणि ते जिंकायचे कसे याचे सूक्ष्म नियोजन करून दिले. बूथ लेव्हल आणि अगदी तळाच्या कार्यकर्त्यांना आपलेसे केल्याने प्रत्येक मतदारापर्यंत पोचून त्यांना भाजपला मत देऊन मला निवडून येणे सोपे झाले. कल्याणशेट्टी यांचे संघटन कौशल्य वाखाणण्याजोगी असून मये येथे नेमकी हीच बाब अधिक फायदेशीर ठरली. कल्याणशेट्टी व त्यांची 40 जणांची टीम माझ्यासाठी दिवसरात्र अथक परीश्रम केल्याने मला यश मिळविणे सोपे झाले.
– प्रेमेंद्र शेट, नवनिर्वाचित आमदार, मये, गोवा