सोलापूर जिल्ह्याची ‘घरकुला’त प्रगती

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत मंजूर घडला पाहिजे ३५ हजार ५६७ घरकुलांना पहिला हप्ता वितरित करण्यात आलेला असून उर्वरित ८९०लाभार्थ्यांना हप्ता वितरीत करावयाची प्रक्रिया सुरू असून यापैकी २४हजार ९१० घरकुले पूर्ण झालेली आहेत.

  सोलापूर : जिल्ह्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत सन २०१६-१७ ते २०-२१ अखेरपर्यंत ५० हजार ७२ घरकुलांचे उद्दिष्ट प्राप्त झालेले होते त्याअनुषंगाने ३६ हजार ४५५ लाभार्थींना मंजुरी देण्यात आलेली आहे. तर ७ हजार ५५८ लाभार्थींना जागा उपलब्ध नाही तर १०२०लाभार्थ्यांना विविध योजनांमधून जागेचा लाभ देण्यात आला आहे तसेच १००१ लाभार्थींचे तात्पुरते स्थलांतरित झालेले असून६ हजार ७८ लाभार्थ्यांना कायमस्वरूपी प्रतीक्षा यादीतून कमी करण्यात आलेले आहे.

  प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत मंजूर घडला पाहिजे ३५ हजार ५६७ घरकुलांना पहिला हप्ता वितरित करण्यात आलेला असून उर्वरित ८९०लाभार्थ्यांना हप्ता वितरीत करावयाची प्रक्रिया सुरू असून यापैकी २४हजार ९१० घरकुले पूर्ण झालेली आहेत.

  राज्य पुरस्कृत आवास योजना ग्रामीण सन २०१६-१७ ते सन २०२०-२१अखेरपर्यंत १५ हजार २७९घरकुले मंजूर करण्यात आली आहेत. या मंजूर लाभार्थीच्या पैकी १४हजार ९१६ लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरित करण्यात आलेला असून आज पर्यंत १२ हजार ५५२ घरकुले पूर्ण करण्यात आलेली आहेत.

  राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना ग्रामीण सन २०१६-१७ ते २०२०- २१ अखेरपर्यंत १४हजार ४९७ घरकुले मंजूर करण्यात आली आहेत. मंजूर लाभार्थीच्या पैकी १४ हजार १४९ लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरित करण्यात आला असून यासाठी ११ हजार ८३६ घरकुल पूर्ण करण्यात आलेली आहे. तसेच शबरी आवास योजना ग्रामीण अंतर्गत सन २०१६-१७ते २०२०१८-१९ अखेर ५८० लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करण्यात आले असून यापैकी ५६८ लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरित झाला असून त्यातील ५२८ घरकुले पूर्ण झालेली आहेत.

  राज्य पुरस्कार पारधी आवास योजना ग्रामीण सन २०१६-१७ ते १८-१९ अखेर २०२ घरकुले मंजूर करण्यात आले आहेत. मंजूर लाभार्थी पैकी २०१ लाभार्थ्यांना पहिला मंजूर करण्यात आला असून त्यातील १८८ घरकुले पूर्ण झालेली आहेत. महा आवास अभियान अंतर्गत प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी डेमो हाऊस मंजूर करण्यात आलेला असून त्यातील दहा हाऊसचे काम सुरू झालेले आहे व त्यातील ८ डेमो हौस पूर्ण झाले आहेत. आवास प्लस जॉब कार्ड मॅपिंग मध्ये 1 लाख ६३ हजार ९४४जॉब कार्ड चे मॅपिंग करण्यात आले आहे.

  महा आवास अभियानाच्या विभागीय कार्यशाळेस व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे सोलापूर येथून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे सहायक प्रकल्प संचालक कुलकर्णी व अन्य अधिकारी उपस्थित होते.

  महाआवास अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात अपूर्ण घरकूलांची कामे पूर्ण करावीत आणि मंजूर घरकूलांची कामे त्वरीत सुरू करावीत, अशा सूचना पुणे विभागाचे अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ.अनिल रामोड यांनी दिल्या.