पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात प्राध्यापकांच्या ८८ जागांवर भरती

पीएचडी, सेट- नेट झालेल्या विद्यार्थ्यांसाठी करिअरची नवी संधी निर्माण झाली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात प्राध्यापक (Professor jobs) पदासाठी लवकरच भरती करण्यात येणार आहे.

  सोलापूर: पीएचडी, सेट- नेट झालेल्या विद्यार्थ्यांसाठी करिअरची नवी संधी निर्माण झाली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात प्राध्यापक (Professor jobs) पदासाठी लवकरच भरती करण्यात येणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली असून , सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) या पदासाठी तब्बल ८८ जागांची पदभरती केली जाणार आहे. प्राध्यापक होऊ इच्छिणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे.

  शैक्षणिक पात्रता

  सहाय्यक प्राध्यापक पदासाठी अर्ज करणारे उमेदवार पदव्युत्तर पदवी पन्नास टक्के गुणांसह उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. तसंच नेट किंवा सेट किंवा पीएचडी समतुल्य पदवी असणे आवश्यक आहे.
  असा करा अर्ज

  est.section@sus.ac.in या ईमेल आयडीवर उमेदवार सर्व गरजेचे कागदपत्र आणि अर्ज पाठवू शकतात. त्यानंतर पात्र उमेदवारांना मुलाखतीबाबत माहिती कळवण्यात येईल अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख २८ जून असणार आहे.

  .