फळबागांची हॉर्टीनेटद्वारे नोंदणी करण्याचे आवाहन

    सोलापूर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : कीटकनाशक उर्वरित अंश व कीड रोगांची हमी देण्याकरिता हॉर्टीनेटद्वारे निर्यातक्षम बागांची नोंदणी करण्यात येते. सन 2020-21 मध्ये सोलापूर जिल्ह्यातून 1486 हेक्टर क्षेत्रावर 2049 फळबाग व भाजीपाला प्लॉटची नोंदणी झालेली आहे. 2021-22 करिता निर्यातक्षम फळे व भाजीपाला पिकांच्या निर्यातीकरिता युरोपियन युनियन व इतर देशांना देखील नोंदणी बंधनकारक करण्यात आलेले आहे.

    जिल्ह्यातील निर्यातक्षम फळे व भाजीपाला उत्पादन करणाऱ्या निर्यातदार शेतकऱ्यांना विनंती करण्यात येते की, 2021-22 करिता नोंदणी / नूतनीकरणासाठी कृषि विभागाच्या कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी यांच्याकडे संपर्क साधून त्वरित विहित नमुन्यातील अर्ज, 7/12 उतारा, 8 अ उतारा, बागेचा नकाशा, व आवश्यक नोंदणी फी (फक्त द्राक्ष पिकासाठी) अर्ज करावेत व आपल्या प्लॉटची नोंदणी करावी असे, आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सोलापूर बाळासाहेब शिंदे यांनी केले.

    ग्रेपनेट, पिक-द्राक्ष,-ऑक्टोबर 2021 ते नोव्हेंबर 2021 -50/-रूपये प्रति 1.20 हेक्टर क्षेत्राकरीता / द्राक्ष लेट फी- नोंव्हेंबर 2021 ते डिसेंबर 2021-100/- रु प्रति 1.20 हेक्टर क्षेत्राकरीता. मँगोनेट- आंबा- डिसेंबर 2021 ते जानेवारी 2022- फी आवश्यकता नाही. अनारनेट-डाळिंब-ऑक्टोबर 2021 ते जानेवारी 2022- फी आवश्यकता नाही. व्हेजनेट-भाजीपाला-वर्षभर सुरु परंतु काढणीच्या अगोदर 15 दिवस आवशयक – फी आवश्यकता नाही. सिट्रसनेट-लिंबुवर्गीय-वर्षभर सुरु परंतु काढणीच्या अगोदर 15 दिवस आवश्यक- फी आवश्यकता नाही.