मोहितेपाटील गटाला २४ मार्च पर्यंत दिलासा

निकाल लागण्यापूर्वी मोहीतेपाटील गटाने मुंबई उच्चन्यायालयासह सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. जिल्हाधिकारी यांनी पूर्ण सुनवणी घेऊन स्थानिक स्तरावर प्रथमता निकाल देण्याचे आदेश पारित करण्यात आले होते.

    सोलापूर : संपूर्ण जिल्हयाला लक्ष लागून राहीलेल्या मोहीतेपाटील गटाला २४ मार्च पर्यंत दिलासा मिळाला आहे. ३१ डिसेंबर २०१९ रोजी जि.प.अध्यक्ष निवडीत राकाँच्या उमेदवाराला मतदान न करता भाजपा समविचारी गटातील उमेदवाराला मतदान केल्यामूळे शितलदेवी मोहीतेपाटील, स्वरूपाराणी मोहीतेपाटील, मंगल वाघमोडे, सुनंदा फूले, अरूण तोडकर,गणेश पाटील यांच्यावर सदस्य अपात्रेतेची कारवाई करण्यात यावी आशी तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली होती. निकाल लागण्यापूर्वी मोहीतेपाटील गटाने मुंबई उच्चन्यायालयासह सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. जिल्हाधिकारी यांनी पूर्ण सुनवणी घेऊन स्थानिक स्तरावर प्रथमता निकाल देण्याचे आदेश पारित करण्यात आले होते.

    न्यायालयाच्या आदेशानूसार सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात सुनवणी ठेवण्यात आली होत्ती. तक्रारदार आणि सामनेवाले यांची रोजनाम्यावर हजेरी घेऊन २४ मार्च तारीख देण्यात आली.यातील मुळ तक्रादार बळीरामकाका साठे यांच्यासह सामनेवाले उपस्थित होती