माळशिरस येथे लोकअदालतीत १५३ प्रकरणांचे निराकरण

लोकअदालतीत १२७ दिवाणी दावे आणि  २६ फौजदारी खटले असे एकूण १५३ प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यात विविध बँकांची प्रकरणे, ग्राम पंचायतीची प्रकरणे, चेक प्रकरणे, बीएसएनएलची प्रकरणे मिटविण्यात आली. त्यामध्ये  १ कोटी, ६६ लाख २ हजार ८०७ रक्कम प्राप्त झाली.

    माळशिरस : न्यायालयातील प्रलंबित तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे तसेच दिवाणी दावे आपसी सामंजस्याने मिटविण्यासाठी शनिवारी माळशिरस तालुका न्यायालयात लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांचे निर्देशानुसार हे राष्ट्रीय लोक अदालत  पार पडले.

    या लोकअदालतीत १२७ दिवाणी दावे आणि  २६ फौजदारी खटले असे एकूण १५३ प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यात विविध बँकांची प्रकरणे, ग्राम पंचायतीची प्रकरणे, चेक प्रकरणे, बीएसएनएलची प्रकरणे मिटविण्यात आली. त्यामध्ये  १ कोटी, ६६ लाख २ हजार ८०७ रक्कम प्राप्त झाली.

    या लोकन्यायालयाचे उद्घाटन जिल्हा न्यायाधीश एम एन पाटील  यांच्या हस्ते झाले. तालुका मुख्य न्यायाधीश जी.एम. नदाफ,   सहदिवाणी न्यायाधीश  पी. पी. कुलकर्णी, वरिष्ठस्तर न्यायाधीश  आर.एस. क्षीरसागर, एम.आर. जाधव हे होते. यावेळी पी. एस. बिचुकले, बी. एस. गोरवे, पी.ए. व्होरा, एस.वी.तरंगे, डी.एस. आडत, सुमीत सावंत, एस.डी. झंजे, एन.ए. फडतरे, एम.एम. गांधी हे विधीतज्ज्ञ उपस्थित होते. सहाय्यक अधीक्षक विजय देसाई, प्रकाश साखरे, शिवगुंडे यांचे सहकार्य लाभले.