मोहोळ तालुका विकास समितीच्या आढावा बैठकीत विविध विषयांचा आढावा

    मोहोळ : तालुक्‍यातील शेतकऱ्यांचे दूध उत्पादन वाढविण्यासाठी त्यांना गाई-गोठे देण्याची गरज असून त्यासाठी प्रयत्न करावेत. राष्ट्रीय महामार्गात पोखरापूर, इंचगाव, घोडेश्वर येथील शाळांचे मूल्यांकन कमी केले असून, त्याचे मूल्यांकन वाढवून घेऊन तेथे मूलभूत सुविधा द्याव्यात. यासह मार्च महिन्यापूर्वी ज्या लाभार्थ्यांना योजना दिलेल्या आहेत, त्यांचे पैसे तात्काळ वितरित करावेत. शिक्षण विभागाने कशाही पद्धतीने असू द्या, पण शिक्षण प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचते केले पाहिजे यांसह विविध विषयांचा आढावा मोहोळ तालुका विकास समितीच्या आढावा बैठकीमध्ये घेण्यात आला.

    पंचायत समितीच्या सभागृहांमध्ये २९ जून रोजी मोहोळ तालुका विकास समितीची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी अर्थ व बांधकाम समितीचे सभापती विजयराज डोंगरे, तर सह अध्यक्षपदी पंचायत समितीच्या सभापती रत्नमाला पोतदार ह्या होत्या.

    यावेळी जि. प. सदस्य उमेश पाटील, जि प सदस्य शैलजा गोडसे, माजी सभापती समता गावडे, माजी उपसभापती साधना देशमुख, गटनेते ज्ञानेश्वर चव्हाण, पं स सदस्य रामराजे कदम, आष्टी चे सरपंच डॉ. अमित व्यवहारे, गटविकास अधिकारी गणेश मोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

    यावेळी सभापती विजयराज डोंगरे, जि प सदस्य उमेश पाटील, जि प सदस्य शैलजा गोडसे यांच्यासह उपस्थित पदाधिकाऱ्यांनी मोहोळ तालुक्यातील पंचायत समितीच्या विविध विभागांतर्गत सुरू असलेल्या उपक्रमाबाबत तसेच कामांबाबत या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली.

    यावेळी गटशिक्षणाधिकारी सिद्धेश्वर निंबर्गी, उप अभियंता गोवदरे, उप अभियंता एस. एम मंडलिक, उपअभियंता गुंड, तालुका वैद्यकीय अधिकारी अरुण पाथरुडकर, पशुसंवर्धन अधिकारी रणवरे, कनिष्ठ प्रशासनाधिकारी संदीप कोळी आदींसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.