अकलूजमध्ये साड्यांच्या दुकानाला भीषण आग; दीड कोटी रुपयांचा माल जळून खाक

सोलापूर जिल्ह्यातील अकलूज (Akluj Fire) येथे मल्हार सिल्क या साड्यांच्या दुकानाला मध्यरात्री भीषण आग (Saree Shop Fire) लागली. या आगीत सुमारे दीड कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती दिली जात आहे. मध्यरात्री अचानकपणे या दुकानातून धूर येत होता. त्यानंतर याची माहिती समजताच अग्निशमन विभागाला कळवण्यात आले.

    अकलूज : सोलापूर जिल्ह्यातील अकलूज (Akluj Fire) येथे मल्हार सिल्क या साड्यांच्या दुकानाला मध्यरात्री भीषण आग (Saree Shop Fire) लागली. या आगीत सुमारे दीड कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती दिली जात आहे. मध्यरात्री अचानकपणे या दुकानातून धूर येत होता. त्यानंतर याची माहिती समजताच अग्निशमन विभागाला कळवण्यात आले.

    अकलूज पोलीस ठाण्याचे काही पोलीस कर्मचारी रात्री गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना मल्हार सिल्क या दुकानातून मोठ्या प्रमाणावर धूर येत असल्याचे दिसले. त्यांनी तातडीने दुकानाचे मालक संगिता शरद गायकवाड व शरद गायकवाड यांना फोन केला. तसेच अग्निशमन दलाला तातडीने फोन करून बोलावून घेतले. नगरपरिषदेच्या नागेश शेटे, विश्वास भोसले, राहुल शिंदे, पप्पू साळवे, संतोष भिंगारदिवे व इतर लोकांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली.

    दरम्यान, नवीन बस स्थानकाशेजारी असलेल्या मल्हार सिल्क या प्रचंड मोठ्या दुकानातील साड्या, ड्रेस, कापड, फर्निचर, मशिनरी, टीव्ही, एसी, कॕमेरे, ब्युटी पार्लर मटेरीयल असे सुमारे दीड कोटी रुपयांचे साहित्य इलेक्ट्रीकल शॉर्ट सर्किटमुळे जळून खाक झाल्याने दुकानाचे मालक गायकवाड दाम्पत्याचे मोठे नुकसान झाले.