जि.प.पदाधिकारी अधिकाऱ्यांचा घोटाळा : जलसंधारणाच्या कामात कोटयावधी भ्रष्टाचार ; सदस्या शैला गोडसे यांची चौकशीची मागणी

शैला गोडसे यांच्या म्हणण्यानुसार गेल्या ३ ते ४ वर्षा पासून जि.प.च्या वतीने तालूक्यात मोठया प्रमाणात नाला सरळीकरण,नाला खोलीकरण आशी कामे झाली आहेत. परंतु असे कोणते ही कामकाज वास्तवीकरित्या झाले नसून केवळ कागदांवर कामकाज झाल्याचे दाखवून कोटयावधीचा अर्थिक भ्रष्टाचार करण्यात आला आहे.

    सोलापूर : जिल्हा परिषद पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताने घोटाळा झाला असून जलसंधारण विभागात कोटयावधीचा अर्थिक भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करित सदस्या शैला गोडसे यांनी चौकशीची मागणी केली आहे.

    याबाबत शैला गोडसे यांच्या म्हणण्यानुसार गेल्या ३ ते ४ वर्षा पासून जि.प.च्या वतीने तालूक्यात मोठया प्रमाणात नाला सरळीकरण,नाला खोलीकरण आशी कामे झाली आहेत. परंतु असे कोणते ही कामकाज वास्तवीकरित्या झाले नसून केवळ कागदांवर कामकाज झाल्याचे दाखवून कोटयावधीचा अर्थिक भ्रष्टाचार करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणावर नाला सरळीकरण खोलीकरणाची कामे अधिकारीच पैशाच्या हव्यासापोटी घेत असल्याची तक्रार माझ्याकडे प्राप्त झाली आहे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होऊन भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शैला गोडसे यांनी दिला आहे.

    सभागृहाला अंधारात ठेवून निर्णय
    जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ४५० शाळा डिजिटल करण्याचा ठराव मंजूर झाला असून कोणत्या प्रकारच्या वस्तू खरेदी करण्यात येणार आहेत यासंदर्भात कोणतेही माहिती प्राथमिक शिक्षण विभागाने दिल्या नसल्याने ही कार्यवाही थांबवण्यात यावी अशीही मागणी शैला गोडसे यांनी केली आहे.