Sharad Pawar's unopposed election of Bharat Bhalke's son as the president of the factory

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने भगिरथ भालके यांची बिनविरोध निवड करुन भारत भालके यांना आनोखी श्रद्धांजली वाहिली आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचाही मोलाटा वाटा आहे. शरद पवार यांनी भगिरथ भालके यांची भेट घेत सांत्वन केले होते.

पंढरपूर : पंढरपूरमधील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी दिवंगत भारत भालके (Bharat Bhalke) यांच्या यांचे सुपुत्र भगिरथ भालके यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत आंमदार भारत भालके यांच्या निधनामुळे कारखान्याच्या अध्यक्षपदाचे पद (president of the factory) रिक्त होते. आता या पदावर त्यांचे सुपुत्र बसून काम पाहणार आहेत.

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने भगिरथ भालके यांची बिनविरोध निवड करुन भारत भालके यांना आनोखी श्रद्धांजली वाहिली आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांचाही मोलाटा वाटा आहे. शरद पवार यांनी भगिरथ भालके यांची भेट घेत सांत्वन केले होते. यावेळी विठ्ठल परिवार एकत्र ठेवण्याची गरज आहे. असे वक्तव्य शरद पवार यांनी केले होते.

आमदार भालके यांना पाणी प्रश्न आणि सहकाराची जाण होती. त्या क्षेत्रातील त्यांचे काम विसरता येणार नाही. विठ्ठल साखर कारखाना सुरू करण्यासाठी त्यांची धडपड होती. यामुळे त्यांचे आजाराकडे दुर्लक्ष झाले. आज भालके आपल्यात नाहीत. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या स्थितीवर सुद्धा शरद पवारांनी बोट ठेवलं. दरम्यान, शरद पवार यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचाराने काम करणाऱ्या सर्वच नेत्यांना यापुढे एकत्र काम करणयाचे आवाहन केलं. जुन्या सहकाऱ्यांना एकत्र आणण्यासाठी पवार सरसावले आहेत.

दरम्यान, पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीतील उमेदवार म्हणून पवार नाव घोषित करतील, अशी अपेक्षा जनतेला होती. पण शरद पवारांनी आपल्या शैलीत याबाबत काहीही स्पष्ट भाष्य न करता, सर्वांनी एकत्र काम करण्याची सूचना दिल्या. त्यामुळे भारत भालके यांच्या पश्चात उमेदवार कोण असेल, याकडे संपूर्ण मतदार संघाचं लक्ष लागलं आहे.