“संजय राऊतांच्या अंगात आलं अन् महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार झालं”

राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम हे एक दिवसाच्या सोलापूर जिल्हा दौऱ्यावर होते. काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये बोलताना त्यांनी हे विधान केलं आहे.

  “महाराष्ट्राच्या इतिहासात अशा गोष्टी कधी घडल्या नाहीत त्या आता घडतायत. महाविकास आघाडी सरकार हे संजय राऊत Sanjay Raut यांच्या अंगात आल्याने अस्तित्वात आलं आहे. आणि जे झालं ते चांगलंच झालं.” असं मंत्री विश्वजित कदम Vishwajeet Kadam यांनी म्हटलं आहे.

  राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम हे एक दिवसाच्या सोलापूर जिल्हा दौऱ्यावर होते. काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये बोलताना त्यांनी हे विधान केलं आहे.

  पुढे बोलताना विश्वजीत कदम म्हणाले, “मी माझ्या विधानसभेच्या निवडणूक प्रचारात मला मतदान केलं तरी मी विरोधी पक्षाचा आमदार होणार असं मतदारांना सांगत होतो. कारण त्यावेळेस वातावरण तसं होतं. नुकतीच लोकसभेची निवडणूक झाली होती आणि केंद्रात भाजपचे सरकार आलं होतं. मात्र विधानसभेच्या निवडणुकीनंतर दोन महिन्यानंतर संजय राऊत यांच्या अंगात आलं आणि महाविकास आघाडीचे सरकार बनले.”

  आमदार प्रणिती शिंदे लवकरच मंत्री होतील

  सोलापूरच्या काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे लवकरच महाराष्ट्राच्या मंत्रिपदी विराजमान होणार असल्याचा दावा विश्वजीत कदम यांनी केला आहे. तसेच शिंदे यांच्या मंत्रीमंडळ प्रवेशाबाबत त्यांनी भाष्य केले आणि शिंदे समर्थकांना आश्चर्याचा धक्का दिला.

  मंत्री कदम म्हणाले की, “शिंदे यांना मोठा वारसा आहे, जनताही त्यांना निवडून देते. मात्र, काँग्रेस पक्षाने त्यांना एकदाही मंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली नाही. प्रणिती शिंदे आमच्यासोबत मंत्रिमंडळात नाहीत, याची खंत वाटते. कदाचित लवकरच त्या या राज्य मंत्रिमंडळात राज्यमंत्रीच नव्हे, तर कॅबिनेट मंत्री होतील.” असे विधान त्यांनी केले.