सोलापूर जिल्हा परिषद ३९ कोटीचे सेस बजेट जाहीर ; शिक्षण आणि बांधकाम विभागाला सर्वाधिक निधी

५० % टक्के निधी होणार नाही कपात

  सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषद सेस ३९ कोटी ७ लाखांचे बजेट अर्थ विभागाने जाहीर केले आहे. चालू २०२१- २२ अर्थिक वर्षात शिक्षण आणि बांधकाम विभागाला सर्वाधीक निधी देण्यात आला आहे. कोरोना लॉकडाऊन परिस्थितीमूळे ५०% निधी कपात करण्याचे धोरण राबविण्यात आले होते. यंदाच्या बजेट मध्ये ५० % निधी कपातीचे धोरण नसल्यामुळे सदस्यांना दिलासा मिळाला आहे.

  याबाबत अर्थविभाग प्रमूख अजयसिंह पवार यांनी दिलेल्या माहीती नुसार जिल्हा परिषदेच्या स्वउत्पन्नाचे सन २०२१-२२ चे मुळ अंदाजपञक जमा ३९ कोटी १७ लाखांचे यातील १० लाख ६९ हजार शिल्लकीचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला आहे. अ-सामान्य प्रशासन ४कोटी १४ लाख ८० हजार ,सामान्य प्रशासन ४० लाख, आरोग्य ३ कोटी, शिक्षण ५ कोटी २७ लाख ६५ हजार, महीला व बाल कल्याण २ कोटी ५६ लाख ५६ हजार, ग्रामीण पाणी पूरवठा २ कोटी ५ लाख,कृषी ३ कोटी ५ लाख,पशूसंवर्धन २ कोटी ७१ लाख, समाज कल्याण ४ कोटी ४० लाख , लघू पाटबंधारे १ कोटी २५ लाख, बांधकाम ९ कोटी ७७ लाख असे ३९ कोटी ७ लाख १७ हजारचे बजेट सादर करण्यात आले आहेत. पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणूक विधानसभा आचारसंहीतेमूळे नाविन्यपूर्ण योजनांची माहीती सांगता येणार नाही , आचार संहीता शिथील झाल्या नंतर सर्वसाधारण सभेत बजेट अवलोकनसाठी सादर करण्यात येणार आहे. सीईओ दिलीप स्वामी यांच्या मान्यतेनी शासनाकडे बजेट सादर करण्यात आले असल्याची ही माहीत अजयसिंह पवार यांनी दिली .

  गेल्या चार वर्षा पासून सातत्याने लागणाऱ्या आचारसंहीतामूळे सदस्यांच्या मान्यतेनी बजेट सादर होत नसल्यामूळे सदस्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. बजेट शासन दरबारी मंजूर झाल्याने सदस्यांचे म्हणणे अथवा वाढीव निधीची मागणी पूर्ण होत नसल्याचे सदस्यांचे म्हणणे आहे.कोरोना लॉकडाऊन आणि ५०% सेस कपाती धोरणामूळे कामकाज पूर्ण होत नसल्याची खंत विविध सभापतीनी व्यक्त केली आहे.

  सोलापूर जिल्हा परिषदेला राज्य शासनाने देऊ केलेल्या ७१ कोटींचा निधी शिल्लक राहीला आहे. जिल्हा नियोजन मंडळ आणि जि.प.सेसफंडाचा यात समावेश आहे. मार्च अखेर असल्याने निधी खर्ची करण्यासाठी विभागप्रमूखांची धडपड दिसून येत आहे.

  सन २०१९ – २० सालातील परवानगी प्राप्त स्कमेतून फेब्रुवारी २०२१ अखेर पर्यंत १२२कोटी ६७ लाख ९३ हजार पैकी ५६ कोटी ७५ लाख इतका निधी शिल्लक राहीला आहे.५३.७४% निधी खर्च करण्यात आल्याची नोंद करण्यात आली आहे. तर जिल्हा परिषदेच्या स्वउत्पनातील २१कोटी १४ लाख ९ हजार प्राप्त निधी पैकी १४ कोटी ९६ लाख इतका निधी शिल्लक राहीला आहे. २९.२३% आत्ता पर्यंत निधी खर्च करण्यात आला आहे.

  जिल्हा वार्षिक योजनेतील ग्रामपंचायत ३कोटी ३४ लाख ३३ हजार ,बांधकाम विभाग २ ,१कोटी ४८लाख ,६९ हजार ,बांधकाम विभाग १ ,१ कोटी २२ लाख ,४० हजार ,ग्रामीण पाणी पूरवठा १कोटी २० लाख ८८ हजार,लघू पाटबंधारे ३कोटी २०लाख ८१ हजार ,कृषी २कोटी ९६ लाख ,७६ हजार, शिक्षण ८ कोटी ७५ लाख ९३ हजार ,आरोग्य १४ कोटी,२९ लाख ३हजार,समाजकल्याण १८कोटी ७८ लाख २८ हजार ,महीलाबाल कल्याण ६१ लाख ९७ हजार,पशूसंवर्धन ८५ लाख ९३ हजार , आशी विभागांची प्राप्त रक्मेतून शिल्लक राहीलेली निधींची आकडेवारी आहे.तर २०२०-२१ सालातील सेसफंडाच्या प्राप्त निधी पैकी ग्रामपंचायत २५ लाख,बांधकाम विभाग २,४४लाख २९हजार ,बांधकाम विभाग १,२कोटी ८७ लाख ९१ हजार,ग्रामीण पाणीपूरवठा ३३लाख २८ हजार ,लघू पाटबंधारे ५०लाख ४६ हजार,कृषी १कोटी ७५ लाख शिक्षण ३कोटी ४१ लाख,२६ हजार ,आरोग्य १कोटी ४७ लाख ,५२ हजार,समाजकल्याण २कोटी २८ लाख, महीलाबाल कल्याण १ कोटी २६ लाख ८ हजार,पशुसंवर्धन ३७ कोटी ३९ हजार , इतका निधी सेसफंडातील शिल्लक राहीला आहे

  ४ कोटी शासन जमा होण्याच्या मार्गावर
  आरोग्य विभागातील ४ कोटी शासन जमा होण्याच्या मार्गावर आहे. एप्रिल अखेर पर्यंत निधी खर्च करण्याची डेडलाईन आहे.