प्लास्टिक पिशव्यांचा वापर बंद करा; अन्यथा…

महाराष्ट्र शासनाने २०१५-१६ साली स्वच्छ भारत योजना सुरु केली. या योजनेअंतर्गत प्लास्टिक निर्मुलन करण्याचे ठरले. अकलूज शहरातील व्यापारी सर्रास ५० मायक्रोनच्या आतील पिशव्यांचा वापर करत असल्याचे निदर्शनास येत आहे.

    अकलूज : तुंबलेल्या गटारी, अङलेले पाणी आणि वाढलेली ङासांची संख्या नको असेल तर प्लास्टिक पिशव्यांचा (Plastic Bags) वापर बंद करा. जर वापर थांबला नाही तर तुमच्यावार दंङात्मक कारवाई करु, असा इशारा अकलूज नगरपरिषदेचे मुख्याधिकारी धैर्यशील जाधव यांनी दिला.

    पञकारांशी बोलताना जाधव म्हणाले, महाराष्ट्र शासनाने २०१५-१६ साली स्वच्छ भारत योजना सुरु केली. या योजनेअंतर्गत प्लास्टिक निर्मुलन करण्याचे ठरले. अकलूज शहरातील व्यापारी सर्रास ५० मायक्रोनच्या आतील पिशव्यांचा वापर करत असल्याचे निदर्शनास येत आहे. या पिशव्यांचे विघटन अनेक वर्षे होत नाही. वापरुन झालेल्या या पिशव्या नागरिक गटारांमध्ये टाकतात. त्यामुळे गटारे तुंबतात. घाण पाणी रस्त्यावर येते. तुंबलेल्या पाण्यात ङास मोठ्या प्रमाणात होतात.

    दुर्गंधी व ङास यांमुळे आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होतात. पर्यावरणाचीही हाणी होतेय. त्यामुळे आम्ही अकलूज परिसरातील व्यापारी व नागरिकांना आवाहन करत आहोत की, त्यांनी प्लास्टिकचा वापर टाळावा. गेल्या चार दिवसांपासून नगरपरिषदेचे कर्मचारी प्रत्येक दुकानांमध्ये जाऊन व्यापाऱ्यांना विनंती करत आहेत.

    सोमवारपासून आम्ही दंङात्मक कारवाई करणे सुरु केले आहे. वापर करताना सापङल्यास पहिल्यावेळी ५ हजार, दुसऱ्यावेळी १० हजार तर तिसऱ्यावेळी गुन्हे दाखल करणार आहोत. नागरिकांनी आपले शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नगरपरिषदेला सहकार्य करावे, असे आवाहन धैर्यशील जाधव यांनी केले आहे.