‘माझी शाळा, माझी जबाबदारी’ योजनेंतर्गत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी

    मोहोळ : मोहोळ तालुक्यातील वाघोली येथील महात्मा गांधी विद्यालयात ‘माझी शाळा, माझी जबाबदारी’ या योजनेंतर्गत इयत्ता ५ वी ते १० वीच्या सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीस सुरुवात करण्यात आली.

    यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र बेगमपूर येथील डॉ. किशोरी कारंडे, डॉ. स्मिता खिलारे, एम. पी. डब्ल्यू. दत्तात्रय लोणारी, मुख्याध्यापक बाळासाहेब पुदे, माने, शोभा सरगुले, संचिता राजमाने, मनिषा वाघमारे, शरद चव्हाण, महादेव गायकवाड, औदुंबर अनपट यांच्यासह प्रशालेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

    या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाघमारे मॅडम यांनी केले. तर प्रशालेच्या वतीने सर्व डॉक्टरांचे व स्टाफचे आभार मुख्याध्यापक बाळासाहेब पुदे यांनी मानले.