बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

केंद्र शासनाच्या जवाहर नवोदय विद्यालय पोखरापूर ता. मोहोळ येथील इयत्ता १२ वीमध्ये शिकत असलेला विद्यार्थी देवानंद ज्ञानेश्वर भोसले वय १७ वर्ष याने अज्ञात कारणावरून हॉस्टेलच्या बाथरूममध्ये नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर विद्यार्थी जेवणासाठी मेस मध्ये आला नाही.

    मोहोळ: केंद्रीय जवाहर नवोदय विद्यालय पोखरापूर ता मोहोळ येथील इयत्ता १२ वी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्याने बाथरूममध्ये नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना सोमवार २९ आक्टोंबर २०२१ रोजी संध्याकाळी ८.१० वा. घडली.

    याबाबत मोहोळ पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र शासनाच्या जवाहर नवोदय विद्यालय पोखरापूर ता. मोहोळ येथील इयत्ता १२ वीमध्ये शिकत असलेला विद्यार्थी देवानंद ज्ञानेश्वर भोसले वय १७ वर्ष याने अज्ञात कारणावरून हॉस्टेलच्या बाथरूममध्ये नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर विद्यार्थी जेवणासाठी मेस मध्ये आला नाही. जेवणाचेवेळी हजेरी घेताना लक्षात येताच होस्टेलमध्ये जाऊन विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी शोधाशोध केल्यावर एक बाथरूम बंद असल्याचे दिसले.

    शिक्षक व प्राचार्यांना संशय आल्याने मोहोळ पोलीस स्टेशनला माहिती दिली. पोलिसासमक्ष त्या बाथरूमचा दरवाजा तोडून शाळेतील शिपायाच्या मदतीने मृतदेह खाली उतरवला. याबाबतची तक्रार प्रा. राजेंद्रप्रसाद विष्णुपंत नाडगौडा यांनी मोहोळ पोलिसात दिली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांचे मार्गदर्शनाखाली एएसआय विजय घोगरे करीत आहेत.