नगरसेवकांसह जि.प.सदस्यांचे स्वप्न भंगले ; सोलापूरची विधानपरिषद लांबणीवर

सोलापूर विधान परिषद मतदारसंघात ७५ % मतदार पात्र नसल्याचा आहवाल राज्य निवडणूक आयोगाने दिल्याने सोलापूरची विधान परिषद निवडणूक लांबणीवर गेल्याची माहीती देण्यात आली आहे.

    सोलापूर : महानगर पालिका नगरसेवकांसह जिल्हापरिषद सदस्यांचे स्वप्नभंगल्याची चर्चा जोर धरत आहे.राज्य निवडणूकने जारी केलेल्या पत्रकात सोलापूर विधान परिषद निवडणूक वगळण्यात आल्याने अनेकांचे हिरसमोड झाला आहे.

    सोलापूर विधान परिषद मतदारसंघात ७५ % मतदार पात्र नसल्याचा आहवाल राज्य निवडणूक आयोगाने दिल्याने सोलापूरची विधान परिषद निवडणूक लांबणीवर गेल्याची माहीती देण्यात आली आहे.राज्य निवडणूक आयोगाने जारी केलेल्या प्रसिध्द पत्रकात सोलापूरसह अहमदनगर या दोन जिल्हयाचे नावे दिसून येत नसल्याने महानगरपालिका नगरसेवक ,जि.प.सदस्यांची निराशा झाली आहे. डिसेंबर महीन्यात निवडणूका होतील असे प्रसिध्द पत्रकात म्हटलं आहे.