बार्शीत जानेवारीमध्ये सहावे समतावादी साहित्य संमेलन ; डॉ. मच्छिंद्र सकटे यांची माहिती

समतावादी साहित्य संमेलनात पाच परिसंवाद, एक प्रकट मुलाखत, निमंत्रित व नवोदितांचे कवी संमेलन, कथाकथन, शाहिरी जलसा असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांचे सत्कार व दि.९ सायं ६ वाजता.समारोप असा भरगच्च कार्यक्रम होणार आहेत.

    बार्शी  : समतावादी सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र राज्य व फुले,शाहू,आंबेडकर,अण्णा भाऊ,अमर शेख विचार प्रतिष्ठान बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ७,८,९ जानेवारी २०२२ रोजी येथील स्व. यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक सभागृहामध्ये सहावे राज्यस्तरीय समतावादी साहित्य संमेलन होणार असल्याची माहिती समतावादी सांस्कृतिक चळवळीचे प्रणेते डॉ प्रा. मच्छिंद्र सकटे यांनी बार्शी येथे दिली.

    श्री शिवाजी महाविद्यालय येथे पार पडलेल्या संयोजन समितीच्या बैठकीत ही माहिती दिली. समतावादी साहित्य संमेलनाच्या संयोजन समितीचे अध्यक्ष जयकुमार शितोळे यांच्या अध्यक्षतेखाली तर प्रमुख मार्गदर्शक कॉम्रेड तानाजी ठोंबरे, प्राचार्या भारती रेवडकर कार्याध्यक्ष संदीप आलाट निमंत्रक सुनील अवघडे व इतर सदस्यांच्या उपस्थितीत संपन्न झाली

    दि. ७ जानेवारी २०२२ रोजी सकाळी नऊ वाजता ग्रंथदिंडी ने सुरुवात होणार आहे. शनिवार दिनांक ८ जानेवारी रोजी सकाळी साडे दहा वाजता साहित्य संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. या समतावादी साहित्य संमेलनात पाच परिसंवाद, एक प्रकट मुलाखत, निमंत्रित व नवोदितांचे कवी संमेलन, कथाकथन, शाहिरी जलसा असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांचे सत्कार व दि.९ सायं ६ वाजता.समारोप असा भरगच्च कार्यक्रम होणार आहेत.

    साहित्यिक लेखक कवी यांच्यासह साहित्यप्रेमी जनतेला देखील याची पर्वणी मिळणार आहे. या बैठकीस यावेळी संयोजन समितीचे कवी शब्बीर मुलानी, वसीम पठाण, गणेश गोडसे, प्रा.स्मिता सुरवसे, डॉ. लाजवंती राठोड, डॉ. बिरा पारसे. राम नवले, उमेश पवार, निलेश खुडे, अमोल आंधळकर, सतीश झोंबाडे, महादेव भिसे, संगीतराव शिंदे आदी उपस्थित होते.