वाळूच्या टेम्पोने पोलिसाला चिरडले; मंगळवेढा तालुक्यातील घटना

गणेश सोनलकर हे उभे होते. त्यावेळी समोरून येणाऱ्या वाळूच्या टेम्पोला हात केला असता वाळू टेम्पोचालकाने गाडी थेट त्यांच्या अंगावरच घातली.

    मंगळवेढा / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : वाळूची गाडी (Sand Vehicle) थांबविताना पोलीस कॉन्स्टेबल गणेश प्रभू सोनलकर यांना भरधाव वेगाने येणाऱ्या वाळू टेम्पोने चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास गोणेवाडी-शिरशी रोडवरील हॅट्सन डेअरी येथे घडली.

    याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा न्यायालयात लोकअदालत असल्यामुळे पोलीस कॉन्स्टेबल गणेश सोनलकर हे समन्स बजावण्यासाठी गेले होते. गोणेवाडीचे पोलीस पाटील यांना हॅट्सन डेअरी येथे बोलवले होते. त्यांची वाट पाहत गणेश सोनलकर हे उभे होते. त्यावेळी समोरून येणाऱ्या वाळूच्या टेम्पोला हात केला असता वाळू टेम्पोचालकाने गाडी थेट त्यांच्या अंगावरच घातली. त्यामुळे पोलीस कॉन्स्टेबल सोनलकर हे गाडीखाली चिरडले. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

    दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनातील अधिकारी हॉस्पिटलमध्ये धावले. या घटनेतील आरोपींना लवकरात लवकर पकडण्यात येणार असल्याचे अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांनी सांगितले.