जखमी बेशुद्ध वृद्धाची सोनसाखळी पळवली

 सांगोला तालुक्यातील कोळा-तिप्पेहळी फाटा येथे दुचाकीवरून घसरून पडलेल्या जखमी वृध्दाच्या गळ्यातील सुमारे ६० हजार रुपये किंमतीची सोन्याची साखळी चोरून नेल्याची घटना सोमवारी (दि.२७) डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

    सांगोला : सांगोला तालुक्यातील कोळा-तिप्पेहळी फाटा येथे दुचाकीवरून घसरून पडलेल्या जखमी वृध्दाच्या गळ्यातील सुमारे ६० हजार रुपये किंमतीची सोन्याची साखळी चोरून नेल्याची घटना सोमवारी (दि.२७) डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

    याप्रकरणी जितेंद्र शामराव बजबळकर (रा. तिप्पेहळी ता. सांगोला) यांनी सांगोला पोलीसात महादेव शिवाजी शिंदे (रा.जुनोनी ता. सांगोला) यांच्याविरोधात फिर्याद दिली. याबाबत अधिक माहिती अशी की, २७ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता फिर्यादीस मित्राचा फोन आला की, कोळा-तिप्पेहाळी फाटा येथे तुझे वडील हे मोटारसायकल घसरुन जखमी अवस्थेत बेशुध्द पडलेले आहेत. तेव्हा सदर ठिकाणी फिर्यादी गेले असता, त्यांच्या ओळखीचा जुनोनी गावातील महादेव शिवाजी शिंदे हा बेशुध्द अवस्थेत असलेल्या वडील शामराव शंकर बजबळकर यांच्या गळ्यातील सोनसाखळी काढून घेवून पळत जात असल्याचे दिसला.