वडिलांना मारहाण का केली? असा जाब विचारणाऱ्या महिलेस बेल्टने मारहाण

    सोलापूर : वडिलांना मारहाण का केली? असा जाब विचारल्याच्या कारणावरून एकाने महिलेस बेल्टने मारहाण केल्याची घटना बुधवारी (दि.२३) सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास सलगर वस्ती डोणगाव रोड येथे घडली. याप्रकरणी अश्विनी नागनाथ सोनकर (वय ३०,रा.सलगर वस्ती, डोणगाव रोड, सोलापूर) यांनी सलगर वस्ती पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून अजय गीते याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी अश्विनी यांच्या वडिलांना मारहाण का केली असा जाब अजय गीते याला विचारले असता, त्याने फिर्यादी अश्विनी यांना मारहाण केली. तसेच फिर्यादी अश्विनी यांना शिवीगाळ करून वडिलांना बघून घेतो, अशी दमदाटी केली. असे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेची नोंद सलगर वस्ती पोलिस ठाण्यात झाली असून, या घटनेचा पुढील तपास पोलिस नाईक यलगुलवार हे करीत आहेत.