सोलापूर जिल्ह्यात २५० शाळांमध्ये ‘विद्यांजली’ उपक्रम राहणार

जिल्ह्यातील किमान २५० शाळांमध्ये केंद्र शासनाचा विद्यांजली उपक्रम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक महाविद्यालयास शाळा दत्तक देणार येणार आहेत. सोलापूर विद्यापीठाने विद्यांजली उपक्रम राबविण्यासाठी ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

  सोलापूर : जिल्ह्यातील किमान २५० शाळांमध्ये केंद्र शासनाचा विद्यांजली उपक्रम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक महाविद्यालयास शाळा दत्तक देणार येणार आहेत. सोलापूर विद्यापीठाने विद्यांजली उपक्रम राबविण्यासाठी ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

  या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या कुलगुरू डाॅ. मृणालिनी फडणवीस या होत्या. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर जिल्हा परिषदेचे सीईओ दिलीप स्वामी हे होते. या कार्यशाळेस प्र-कुलगुरू, डॉ. विकास पाटील, प्र. कुलसचिव डॉ. सुरेश पवार साधन व्यक्ती प्आंतर-विद्याशाखीय अभ्यासचे अधिष्ठाता डॉ. व्ही. पी. शिखरे, आर्टस अँड कॉमर्स महाविद्यालय, माढा.चे प्रा. डॉ. एस. पी. राजगुरू उपस्थित होते.

  सोलापूर विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. व्ही. पी. शिखरे, आर्टस अँड कॉमर्स महाविद्यालय, माढाचे प्रा. डॉ. एस. पी. राजगुरू यांनी विद्यांजलीबाबत मार्गदर्शन केले. सामाजिक जबाबदारी व समुदायाच्या सहाय्याने शाळांना पायाभूत सुविधा व गुणवत्ता वाढीचे दृष्टिकोनातून मजबूत करणे हा प्रमुख उद्देश्य असल्याचे डाॅ. राजगुरू यांनी सांगितले. येत्या १५ दिवसात शाळांची निवड करणेत येणार आहे.

  स्वच्छ सुंदर शाळाच्या धर्तीवर विद्यांजली उपक्रमास सहकार्य करू : दिलीप स्वामी

  शिक्षण विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच प्राथमिक शिक्षकांनी मनावर घेतले तर काय होऊ शकते, याचा प्रत्यय स्वच्छ सुंदर शाळामुळे आला आहे. त्याच धर्तीवर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ व सोलापूर जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यांजली उपक्रम यशस्वी करू. जिल्हा परिषदेचे उपक्रमांत कुलगुरू फडणवीस यांचे योगदान आहे. महाविद्यालये शाळा दत्तक घेऊन त्या ठिकाणी कोविडमुळे जी मुले सघ्या घरी आहेत त्यांना मदत होईल. महाविद्यालयांना मदतीसाठी नोडल अधिकारी नेमणेत येणार आहेत. या बरोबरच नमामी चंद्रभागासाठी नदीकाठची गावे महाविद्यालयांनी दत्तक घेण्यासाठी विद्यापीठांत बैठक घेण्याबाबत चर्चा करण्यात आली.

  प्राथमिक शाळांसाठी विद्यापीठ पुढाकार घेईल : कुलगुरू डाॅ. फडणवीस

  सोलापूर जिल्ह्यातील महाविद्यालयाचे नजीक असलेले किमान २ पेक्षा अधिक शाळा ११५ महाविदयालये दत्तक घेऊन त्या ठिकाणी मुला- मुलींचा आहार, गुणवत्ता वाढी साठी शैक्षणिक उपक्रम , आरोग्य विषयक मार्गर्दर्शन व सुविधा देणार आहे. स्वच्छ सुंदर शाळांत चांगले काम झाले आहे. सिईओ दिलीप स्वामी यांचे चांगले सहकार्य विद्यापीठास आहे. या निमित्ताने महाविद्यालयाचा सहभाग घेणार असल्याचे कुलगुरू डाॅ. फडणवीस यांनी सांगितले.