प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

बार्शीतील शेकडो गुंतवणुकदारांना कोट्यवधी रुपयांचा चुना लावून फरार झालेल्या विशाल फटे याच्या वडील व भावास बार्शी पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. त्या दोघास शनिवारी न्यायालयात उभे केले असता 20 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश बार्शी न्यायालयाने दिले.

    बार्शी / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : बार्शीतील शेकडो गुंतवणुकदारांना कोट्यवधी रुपयांचा चुना लावून फरार झालेल्या विशाल फटे याच्या वडील व भावास बार्शी पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. त्या दोघास शनिवारी न्यायालयात उभे केले असता 20 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश बार्शी न्यायालयाने दिले.

    बार्शी पोलीस ठाण्यात प्रथमदर्शनी पाच कोटी ६३ लाख रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर शहर व परिसरातील इतर गुंतवणूकदारांनी पोलिसांकडे विशाल फटे याच्या विरोधात तक्रारी अर्ज देण्यास सुरवात केली आहे. बार्शीमध्ये कोट्यवधी रुपयाचे सुमारे 50 अर्ज आल्याची माहिती पोलिस निरीक्षक रामदास शेळके यांनी यावेळी ‘नवराष्ट्र’ला दिली.

    शेअर बाजारात पैसे गुंतवून दहा वीस टक्के परतावा मिळवून देण्याचा आमिष दाखवून विशाल फटे यांनी सुमारे अडीचशे कोटींहून जास्त रुपयांचा आर्थिक घोटाळा केला आहे. या घटनेनंतर त्याचे कुटुंबीय अचानक गायब झाले होते. परंतु, बार्शी पोलिसांनी त्याचे वडील अंबादास गणपत फटे, भाऊ वैभव अंबादास फटे यांना अटक केली. त्यांना शनिवारी न्यायालयाने २० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिल्याची माहिती पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांनी दिली.