सोलापूर जिल्ह्यात ३ जानेवारीपासून दोन लसीकरण मोहीम

मोहिमेमध्ये १ वर्ष ते १५ वर्ष वयोगटातील बालकांना जापनीज मेंदूज्वर ची लस दिली जाणार असून पहिले दोन आठवडे संस्थेमध्ये तर पुढील लसीकरण गावनिहाय करण्यात येणार आहे. यासाठी शिक्षण विभाग महिला व बालकल्याण विभाग तसेच ग्रामपंचायत विभागाची मदत घेतली जाणार असून या सर्वांना प्रशिक्षण घेऊन मोहिमेचे स्वरूप व उद्दिष्टपूर्तीसाठीचे नियोजन केले आहे.

    सोलापूर : जानेवारीपासून सोलापूर जिल्ह्यात जापनीज मेंदूज्वर तसेच १५ ते १८ वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांसाठी कोविड लसीकरण मोहीम राबविण्यासाठी आरोग्य यंत्रणा व जिल्हा परिषद प्रशासन सज्ज असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले. सोलापूर जिल्ह्यामध्ये जापनीज मेंदूज्वर लसीकरण मोहिमेसाठी ग्रामीण भागासाठी ८,९४,३५७ व सोलापूर महानगरपालिका १,८२००० असे एकूण १०,७६,३५७उद्दिष्ट आहे.

    या मोहिमेमध्ये १ वर्ष ते १५ वर्ष वयोगटातील बालकांना जापनीज मेंदूज्वर ची लस दिली जाणार असून पहिले दोन आठवडे संस्थेमध्ये तर पुढील लसीकरण गावनिहाय करण्यात येणार आहे. यासाठी शिक्षण विभाग महिला व बालकल्याण विभाग तसेच ग्रामपंचायत विभागाची मदत घेतली जाणार असून या सर्वांना प्रशिक्षण घेऊन मोहिमेचे स्वरूप व उद्दिष्टपूर्तीसाठीचे नियोजन केले आहे. दिनांक ३ जानेवारी पासूनच १५ ते १८ वर्षे वयोगटातील २,२६,४१२ लाभार्थींसाठी कोवीड लसीकरण मोहीम राबविण्यात येणार असून यासाठी कोवक्सिन (Covaxin)ही लस वापरण्यात येणार आहे.प्रातिनिधिक स्वरूपात तीन तारखेला ग्रामीण भागामध्ये ११ ठिकाणी या लसीकरणाची सुरुवात करून त्यानंतर सर्व संस्थांमध्ये लसीकरण करण्यात येणार आहे.

    सर्वांनी प्रशासनाच्या आवाहनास प्रतिसाद देऊन वरील दोन्ही लसीकरण मोहीम यशस्वी कराव्यात असे आवाहन जिल्हा परिषद सोलापूर मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले आहे.

    पंधरा ते अठरा वयोगटातील मुलांसाठी कोविड लसीकरणासाठी ऑनलाईन व ऑनस्पॉट असे दोन्ही प्रकारचे पर्याय उपलब्ध करून दिले जाणार आहेत.