मोदी सरकारच्या आर्थिक अडवणुकीमुळे राज्य सरकार आर्थिक अडचणीत : विश्वजित कदम

  सोलापूर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : केंद्रातील मोदी सरकारच्या आर्थिक अडवणूकमुळे राज्य सरकार अडचणीत येत असल्याचे वक्तव्य सहकार व कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी केले आहे. विश्वजीत कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत सोलापूर शहर व जिल्हा कॉंग्रेस कमिटी पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक कॉंग्रेस भवन सोलापूर येथे आयोजित करण्यात आली होती.

  यावेळी जिल्हा अध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील, माजी आमदार प्रकाश यलगुलवार, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, नगरसेवक बाबा मिस्त्री, कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, अरुण शर्मा, सोमपा गटनेते चेतन नरोटे, माजी जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब शेळके, करमाळा नगराध्यक्ष वैभवराजे जगताप, मोहोळचे नगराध्यक्षा शाहीन शेख, नगरसेवक शिवा बाटलीवाला, नरसिंग कोळी, नगरसेविका अनुराधा काटकर, परवीन इनामदार, वैष्णवी करगुळे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

  विश्वजित कदम म्हणाले की, मोदी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे आज शेतकरी अडचणीत सापडला आहे. दिल्लीच्या सीमेवर शेतकरी वर्षभर आंदोलन करत आहेत. त्यांच्याशी साधी चर्चासुद्धा मोदी सरकार करायला तयार नाही. मागील भाजप सरकारच्या कार्यकाळात ऊर्जा खात्यात चाळीस हजार कोटी रुपयांची तूट वाढली होती. ती भरून काढतानाच राज्यातील महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांचे वीज खंडित न करण्याचे निर्णय घेतला आहे. शेतीमालाचे उत्पादन वाढल्यामुळे किमतीवर परिणाम झाले आहे. पण महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांसोबत आहे. भाजपची मंडळी फसवी आहेत म्हणून तीन पक्षांनी मिळुन सर्वसामान्य जनतेसाठी युती करून महाविकास आघाडी सरकार स्थापन केले आहे. भाजपने खोटी व भरपूर निकष लावून फसवी कर्जमाफी केली होती. पण महाविकास आघाडी सरकारमध्ये मला सहकार, कृषी खाते मिळाले.

  साधे सोपे निकष लावून महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून कर्जमाफी केली.

  गेल्या दीड वर्षांपासून कोरोनामुळे राज्य शासनाचे उत्पन्न कमी झाले आहे. केंद्रातील मोदी सरकारने तीस हजार कोटींची जीएसटीची रक्कम देत नाही. त्यामुळे आज महाराष्ट्र आर्थिक संकटात आहे. कोरोना पार्श्वभूमीवर कोणतेही पूर्वसूचना न देता मोदी सरकारने लॉकडाऊन केला. लाखो लोक रस्त्यावर भुकेने व्याकुळ चालत गावी गेले. त्यात हजारो मेले महाराष्ट्राला जाणीवपूर्वक लसी व रॅमिडिसीवर, औषधांचा पुरवठा कमी करण्यात आला. पण महाविकास आघाडी सरकारने धाडसी पाऊल उचलून कोरोनापासून संरक्षण करणे, उपचार करणे, कार्यक्षम आरोग्य सुविधा उभारले, आरोग्यासाठी भरपूर निधी दिला यामुळे आज कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येत आहे.

  कॉंग्रेस पक्षाने देशाला स्वातंत्र्य मिळवून देत इंग्रजांना हाकलून दिले तर हा भाजप काय चीज आहे. यांनाही सत्तेवरून पायउतार करण्यासाठी तयार रहा, आज रस्त्यावरील लढाईसोबत सोशल मीडियावर ही लढाई लढायचे आहे. गेले सात वर्षे भाजप देशाची फसवणूक करत आहे. आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती नगरपालिका निवडणुकीची जोरदार तयारी स्वतःच्या हिमतीवर करून सत्ता काबीज करा, असे आवाहन मंत्री कदम यांनी केले.

  यावेळी महिला अध्यक्ष हेमा चिंचोळकर, माजी महापौर नलिनी चंदेले, आरिफ शेख, युवक कॉंग्रेस अध्यक्ष अंबादास करगुळे, एनएसयूआय जिल्हाध्यक्ष गणेश डोंगरे, प्रदेश चिटणीस नरसिंह असादे, किसन मेकाले गुरुजी, पंडित सातपुते, अंबादास गुत्तीकोंडा, बसवराज म्हेत्रे, ब्लॉक अध्यक्ष अरुण साठे, देवा गायकवाड, बाबुराव म्हेत्रे, तालुका अध्यक्ष सौदागर जाधव, जीवनदत्त अरगडे, प्रा. सिद्राम सलवदे, राजेश भादुले, हणमंत मोरे, गोरख लबडे, वसीम पठाण, दादासाहेब साठे, अशोक कलशेट्टी, नागनाथ कदम, हसीब नदाफ, हाजीमलंग नदाफ, भारत जाधव, राजन कामत, सिद्राम अट्टेलुर, भिमाशंकर टेकाळे, तिरुपती परकीपंडला, गणेश साळुंखे, विवेक कन्ना, सैफन शेख, योगेश मार्गम, सिद्धराम चाकोते, दत्तू बंदपट्टे, युवराज जाधव, अमोल भोसले, नागेश गंगेकर, सुरेश शिवपुजे यांच्यासह इतर उपस्थित होते.