जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था नियमित नंबर एकतर्फे एक कोटीचा लाभांश वाटप

    सोलापूर : जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था नियमित नंबर एक सोलापूर या पतसंस्थेचे सन २०२०-२१ ची ८७ वी सर्वसाधारण सभा रविवारी (दि.२७) ऑनलाईन व सर्क्युलर मीटिंग पद्धतीने होणार आहे. २०२०-२१ यावर्षी संस्थेस ६७ लाखांचा निव्वळ नफा झाला. त्या अनुषंगाने नफ्यातून लाभांश व बचत ठेवीवरील व्याज असे एकूण एक कोटीचे वाटप मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या शुभहस्ते ऑनलाईन वितरित होणार आहे. ही रक्कम सभासदांच्या खात्यावर सोमवारी जमा होणार आहे.

    पतसंस्था कर्जावर सहा टक्के दराने व्याज आकारणी करते. वसुली कमी होऊनही संस्थेने अत्यंत काटकसरीने कामकाज करून व बचत ठेव व्याजावर शेकडा पाच टक्क्यांनी लाभांश अदा करण्यात येत आहे. संस्थेचे भाग भांडवल १३.२६ कोटी झाले असून, बचत ठेव ९ कोटींची आहे. सध्या स्व भांडवली कर्ज वितरीत करते. सुसज्ज मालकीचे कार्यालय, सभासदांसाठी विश्रामग्रह सोय, वैद्यकीय विमा योजना, कुटुंब संरक्षण विमा योजना, एसएमएस सेवा आदी सुविधा असल्याचे चेअरमन श्रीशैल्य देशमुख यांनी सूचित केले.

    दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेनुसार एक पद – एक वृक्ष या मोहिअंतर्गत रोप खरेदीसाठी १०० रुपये व सॅनिटायझरसाठी ५० रुपये असे एकूण १५० रुपये लाभांश शिवाय विशेष भेट देण्यात येत आहे. वृक्षारोपण व त्याचे संवर्धन योजनेत सहभागी होण्याचे आवाहन केले. पतसंस्थेचे वार्षिक अहवालच्या माध्यमातून कोरोनाची तिसरी लाट व लहान मुलांचे आरोग्य संवर्धनविषयी चित्राद्वारे संदेश देण्यात आले आहे.

    सामाजिक दायित्वतून कोरोना केअर सेंटर, सॅनिटायझर, मास्क, गरजूंना अन्नधान्य आदी वाटपही या वर्षभरात केल्याचे व्हाईस चेअरमन यांनी ऑनलाईन सभेत सांगितले. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे , उपाध्यक्ष दिलीप चव्हाण , सभापती मा.विजयराज डोंगरे ,अनिल मो टे,स्वाती शट गार, संगीता धांडोरे ,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजय सिंह पवार उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासन परमेश्‍वर राऊत चंचल पाटील आदी उपस्थित राहणार आहेत.

    जिल्हा परिषद सोलापूर मार्फत सोलापूर जिल्ह्यातून कोरोना निर्मूलनासाठी काम केलेल्या कोविड योद्धे म्हणून दिलीप स्वामी, डॉ. शीतल कुमार जाधव साहेब, डॉ. अनिरुद्ध पिंपळे ,डॉ.संतोष जोगदंड, डॉ. विलास सरवदे व त्याच पद्धतीने एक खातेप्रमुख, गटविकास अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, एक महिला व एक पुरुष आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर, अंगणवाडी पर्यवेक्षिका ,अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचे प्रातिनिधिक स्वरूपात केलेल्या कार्याचा सन्मान म्हणून त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.