
वित्त विभागाकडे ही प्रकरण येण्यापूर्वी आरोग्य विभागाने सर्व साधारण ७५० प्रकरणे दिनांकित पद्धतीनें जेष्ठतेनुसार व कोणतही आक्षेप येणार नाही अशा रितीने तयार करून पाठविली होती. याकामी कनिष्ठ प्रशासन अधिकारी नागेश पाटील, कनिष्ठ सहायक चंद्रकांत कोळी यांनी प्रयत्न केले.
सोलापूर : गेल्या अनेक दिवसापासून कर्मचाऱ्यांचे वैद्यकीय परिपूर्ती देयक प्रलंबित असल्याने सर्व सवर्गीय संघटनेची देयके निकाली काढण्यासाठी मागणी होती. ही बाब लक्षात घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी तातडीने सर्व वैद्यकीय प्रतिपूर्ती देयक निकाली काढावेत असे आदेश सर्व विभागप्रमुख ,आरोग्य विभाग व अर्थ विभागाला दिले होते. या अनुषंगाने मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजयसींह पवार यांनी अर्थ विभागातील १० अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या विशेष पथकाची नियुक्ती करून दोन दिवसात २६५ प्रकरणांपैकी २२० प्रकरणे निकाली काढली. सुट्टीच्या दिवशीही विशेष काम करून या प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. या पथकामध्ये उपमुख्य लेखा वित्त अधिकारी उत्तम सुर्वे, लेखाधिकारी कैलास कुंभार, सहाय्यक लेखाधिकारी एस. टी.नादरगी, कनिष्ठ लेखाधिकारी जगदीश मेटकरी ए.ए.सातपुते, वरिष्ठ साहाय्यक .जे.एस शेख, लक्ष्मण झिपरे,एस. बी.खराडे, एन.एन.मिठा, कनिष्ठ सहायक .के.डी. सुलाने, जी.के. टाले,वी.एम लिंगराज,एस.एस. घोडके ह्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश होता. वित्त विभागाकडे ही प्रकरण येण्यापूर्वी आरोग्य विभागाने सर्व साधारण ७५० प्रकरणे दिनांकित पद्धतीनें जेष्ठतेनुसार व कोणतही आक्षेप येणार नाही अशा रितीने तयार करून पाठविली होती. याकामी कनिष्ठ प्रशासन अधिकारी नागेश पाटील, कनिष्ठ सहायक चंद्रकांत कोळी यांनी प्रयत्न केले.
या दोन्ही मोहिमेमुळे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलिप स्वामी यांनी सूचीत केले प्रमाणे या कामात गती प्राप्त झाल्याने लवकरच सर्व वैदकीय परिपूर्ती देयके लवकरच निकाली निघतील असे मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजयसींह पवार यांनी सांगीतले. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी या पथकाचे कौतुक करून उर्वरीत प्रकरण त्वरीत निकाली काढण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. प्रलंबित वैद्यकीय देयके वेगाने निकाली निघत असल्याने सर्व संवर्गीय कर्मचाऱ्यांमधून आनंद व्यक्त केला जात आहे.