‘फेडरेशन ऑफ मल्टीस्टेट’च्या क्रेडिट संचालकपदी सुकुमार पाटील

महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटींच्या फेडरेशन ऑफ मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि. पुणे या संस्थेची विशेष सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. या सभेत कर्मवीर भाऊराव पाटील मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी जयसिंगपूरचे विद्यमान संचालक सुकुमार पाटील (Sukumar Patil) (रा.माणगाव ता.हातकणंगले) यांची या फेडरेशनच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाली.

    जयसिंगपूर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटींच्या फेडरेशन ऑफ मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि. पुणे या संस्थेची विशेष सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. या सभेत कर्मवीर भाऊराव पाटील मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी जयसिंगपूरचे विद्यमान संचालक सुकुमार पाटील (Sukumar Patil) (रा.माणगाव ता.हातकणंगले) यांची या फेडरेशनच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाली.

    कोल्हापूर जिल्ह्यातून फेडरेशनवर प्रतिनिधित्व मिळाल्यामुळे या निवडीबाबत सहकार क्षेत्रातून समाधान व्यक्त होत आहे. माणगांव येथील ग्रामस्थ व कर्मवीर मल्टीस्टेट संस्थेचे चेअरमन व सर्व पदाधिकारी यांनी त्यांचे कौतुक व अभिनंदन करुन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

    याप्रसंगी सुकुमार पाटील म्हणाले, फेडरेशनच्या माध्यमातून अध्यक्ष सुरेश वाबळे व संस्थापक अ‍ॅड. एस. एस. गडगे यांच्या मार्गदर्शनाखाली मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटींचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी केंद्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करणार असून, स्वतंत्र सहकार मंत्रालय झाल्यामुळे यास लवकरच यश मिळेल, अशी आशा व्यक्त केली.

    यावेळी चेअरमन भूपाल गिरमल, व्हा. चेअरमन वि. दा. आवटी, संचालक प्रा. डी. ए. पाटील, अरविंद मजलेकर, आदिनाथ किणींगे, रमेश पाटील, कुमार पाटील, राजेंद्र नांदणे, पार्श्वनाथ पाटील, सीईओ रविंद्र पाटील, व्ही. के. पाटील, जे. आर. पाटील, अमरसिंह उपाध्ये, शांतिनाथ भरमगोंडा, संजय पाटील व मित्रपरीवार आदी उपस्थित होते.