पुसेसावळी बाजारात चोरी करणारे दोघे अटकेत; औंध पोलिसांची कारवाई

पुसेसावळी बाजारात १९ मोबाईल व २० तोळे सोन्याची चोरी करणाऱ्या दोघांवर औंध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून सुमारे ८ लाख ७५ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला.

    औंध : पुसेसावळी बाजारात १९ मोबाईल व २० तोळे सोन्याची चोरी करणाऱ्या दोघांवर औंध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून सुमारे ८ लाख ७५ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला.

    याबाबत औंध पोलीस स्टेशनमधून मिळालेली अधिक माहिती अशी, पुसेसावळी येथे आठवडी बाजारात मोबाईल चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने बाजारात पेट्रोलिंग करत असताना औंध पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार प्रशांत पाटील, कुंडलिक कटरे, वाघ, सरतापे यांना खिसेकापू व मोबाईल चोरी करणारे अट्टल गुन्हेगार शहिदा ऊर्फ भाभी, महादेव तुपे व महेश प्रभाकर चव्हाण (रा. पानवण. ता. माण) हे दुचाकीवरुन जाताना दिसले. यावेळी गस्त घालणाऱ्या पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांची झाडाझडती घेतली असता त्यांच्याजवळ 7 मोबाईल आढळून आले.

    त्यांच्यावर औंध ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी त्यांच्यावर म्हसवड, वडूज, वाई,पुसेगाव,कराड ,उंब्रज विटा,बार्शी, कुडची आदी ठिकाणी चोरीचे गुन्हे दाखल झाले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. दरम्यान, शहीदा ऊर्फ भाभी महादेव तुपे हिच्या घराची झाडाझडती घेतली असता 13 मोबाईल व सुमारे 20 तोळे सोने सापडले असून औंध पोलीसांनी त्यांच्याकडून सुमारे ८ लाख ७५ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला.

    याप्रकरणी शाहिदा ऊर्फ भाभी तुपे व महेश चव्हाण या दोघा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधिक्षक अजित बोहाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली औंध पोलीस स्टेशनचे सपोनि प्रशांत बधे, सहाय्यक फौजदार जाधव, प्रशांत पाटील, वाघ, कुंडलिक कटरे, जाधव, काळेल, काळे, पोळ यांनी सहभाग घेतला.