अविनाश भोसलेंची 164 कोटी तर संजय छाब्रिया यांची 251 संपत्ती जप्त, येस बँक घोटाळा प्रकरणी कारवाई

काही दिवसांपूर्वीच पुण्यातील व्यावसायिक अविनाश भोसले सीबीआयनं प्रॉपर्टी जप्तीची कारवाई केली होती. दोन दिवसाआधी यांना सीबीआयने सर्वात मोठा दणका देत त्यांचे हेलिकॉप्टरही जप्त केलं

    पुणे  : येस बॅंक घोटाळ्या प्रकरणी पुण्यातील प्रसिध्द उद्योजक अविनाश भोसले ( Avinash Bhosale ) यांची 164 मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. तर, संजय छाब्रिया (Sanjay Chabriya) यांची 251 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. याशिवाय अविनाश भोसले यांचा मुंबईतील फ्लॅट जप्त केला आहे तर छाब्रिया यांची बंगळुरु आणि सांताक्रुझमधील जमीन तसेच फ्लॅट जप्त करण्यात आला आहे.

    काही दिवसांपूर्वीच पुण्यातील व्यावसायिक अविनाश भोसले सीबीआयनं प्रॉपर्टी जप्तीची कारवाई केली होती. दोन दिवसाआधी यांना सीबीआयने सर्वात मोठा दणका देत त्यांचे हेलिकॉप्टरही जप्त केलं. आता त्यांची मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. सीबीआयने अविनाश भोसले यांना सर्वात मोठा दणका देत त्यांचे हेलिकॉप्टरही जप्त केलं आहे. मनी लॉन्ड्री प्रकरणातील सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या मागे तपास यंत्रणांचा ससेमिरा सुरू होता. सीबीआयकडून अनेकदा त्यांची चौकशी झाली होती. तसेच त्यांना अटकीही झाली होती. याच प्रकरणात त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी सीबीआयकडून कसूर करण्यात आली होती. हे प्रकरण आता दिवसेंदिवस त्यांच्या अडचणी वाढवताना दिसताहेत. यात आणखी काही महत्वाचे धागेदोरे तपास यंत्रणांच्या हाती लागण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.