रेल्वेच्या ब्लॉकमुळे प्रवाशांना फटका, पुण्याहून धावणाऱ्या नऊ गाड्या रद्द; ४० हजार प्रवाशांना त्रास

सोलापूर रेल्वे विभागाने ऐन गणेशोत्सवाच्या काळात रविवारी ट्रॅफिक ब्लॉक घेतला. त्यामुळे मनमाड ते दौंड दरम्यानची सेवा विस्कळित झाली. पुण्याहून धावणाऱ्या नऊ गाड्या रद्द झाल्या, तर ११ गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला. त्याचा फटका सुमारे ४० हजार प्रवाशांना बसला. नागपूरहून पुण्याला येणाऱ्या गाड्यांना तब्बल १२ तास विलंब झाला. मार्गातील झालेल्या बदलामुळे प्रवाशांना फटका बसला.

    पुणे : सोलापूर रेल्वे विभागाने ऐन गणेशोत्सवाच्या काळात रविवारी ट्रॅफिक ब्लॉक घेतला. त्यामुळे मनमाड ते दौंड दरम्यानची सेवा विस्कळित झाली. पुण्याहून धावणाऱ्या नऊ गाड्या रद्द झाल्या, तर ११ गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला. त्याचा फटका सुमारे ४० हजार प्रवाशांना बसला. नागपूरहून पुण्याला येणाऱ्या गाड्यांना तब्बल १२ तास विलंब झाला. मार्गातील झालेल्या बदलामुळे प्रवाशांना फटका बसला.

    रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी रविवारी ”नॉन इंटरलॉकिंग” चे काम करण्यात आले. यासाठी दौंड-मनमाड दरम्यानची सेवा खंडित करण्यात आली. नागपूरहून पुण्याला येणारी महाराष्ट्र व नागपूर – पुणे एक्स्प्रेस मनमाड वरून छत्रपती संभाजीनगर, परभणी, लातूर, कुर्डुवाडी, दौंडमार्गे पुण्याला पोचली. मात्र त्यासाठी १२ तासांपेक्षा जास्त वेळ लागला.

    या गाड्यांचा मार्ग बदलला

    जम्मू तावी पुणे झेलम, निजामुद्दीन-गोवा, निजामुद्दीन-हुबळी, अजनी-पुणे, दरभंगा-पुणे, बंगळूर-नवी दिल्ली, यशवंतपूर-अहमदाबाद, कोल्हापूर-गोंदिया, पुणे-नागपूर, गोंदिया-कोल्हापूर, नागपूर-पुणे