एसी लोकलच्या विरोधात ठाणेकर संतप्त, एसी लोकल रोखत केलं आंदोलन

ठाणे - कळवा रेल्वे स्थानकात प्रवाशांनी आंदोलनाचं हत्यार उपसलं. एसी लोकलला विरोध दर्शवत प्रवाशांनी काही वेळासाठी एसी लोकलही रोखली.

    ठाणे : मध्य रेल्वेवरील एसी लोकलच्या (Mumbai AC Local) फेऱ्यांमध्ये वाढ करण्याचा नुकताचं निर्णय घेण्यात आला आहे. या अतिरिक्त एसी लोकल साध्या लोकल बंद करून चालवण्यात येणार आहेत. हा निर्णय प्रवाशांना आवडलेला दिसत नाही आहे. या विरोधात आज ठाणे-कळवा रेल्वे स्थानकात प्रवाशांनी आंदोलन केलं.

    यावेळी संतप्त प्रवाशांनी काही वेळासाठी एसी लोकल रोखली होती. यावेळी रेल्वे पोलिसांनी तात्काळ या घटनेची दखल घेत, प्रवाशांना हटवलं आणि लोकल वाहतूक पूर्ववत करण्यात आली. एसी लोकलच्या फेऱ्या वाढल्यानं प्रवासी आक्रमक झाले असून या निर्णयाचा विरोध करत आहेत. या निर्णया विरोधात प्रवासी संघटनाही आक्रमक झालेत आहेत. मध्य रेल्वेवर काही महिन्यांपूर्वी एसी लोकल सुरू करत असताना हेच चित्र बघायला मिळालं होतं. मात्र प्रवाशांचा विरोध न जुमानता रेल्वे प्रशासनाने आपले निर्णय कायम ठेवलेत. एसी लोकलमुळे सर्वसामान्यांचा खोंळबा होत असून एसी लोकलचे दरही सामन्यांना न परवडणारे आहेत. यामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर आहे.