pathaan

शाहरुख खानच्या पठाण चित्रपटाला हिंदुत्ववादी संघटना या विरोध करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून पठाण चित्रपट बॉयकॉट करण्याची मागणी देखील सोशल मीडियावर केली जात आहे. पठाण या चित्रपटातील बेशरम रंग आणि झुमे जो पठाण ही गाणी प्रेक्षकांच्या भेटीस आली.

    पुणे – अभिनेता शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) पठाण (Pathaan) चित्रपटावरून पुण्यात (Pune) बजरंग दल आक्रमक झाला आहे. शहरातील राहुल चित्रपटगृहाच्या बाहेरील पोस्टर बजरंग दलाकडून काढण्यात आले आहे. शाहरुख खानच्या काही चाहत्यांनी चित्रपटगृहाबाहेर हे पोस्टर लावले होते. बजरंग दलानं राहुल थिएटरच्या चालकांना इशारा देऊन पोस्टर काढण्याची विनंती केली. त्यानंतर हे पोस्टर हटवण्यात आले.

    हिंदुत्ववादी संघटनांचा विरोध
    शाहरुख खानच्या पठाण चित्रपटाला हिंदुत्ववादी संघटना या विरोध करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून पठाण चित्रपट बॉयकॉट करण्याची मागणी देखील सोशल मीडियावर केली जात आहे. पठाण या चित्रपटातील बेशरम रंग आणि झुमे जो पठाण ही गाणी प्रेक्षकांच्या भेटीस आली. यामधील बेशरम गाण्यामधील दीपिका पादुकोणच्या (Deepika Padukone) बिकिनीच्या रंगामुळे वाद निर्माण झाला होता. अनेकांनी दीपिकाच्या बिकिनीच्या रंगावर टीका केली होती. त्यानंतर हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला.