
रुग्णावर उपचार करीत असलेल्या कनिष्ठ निवासी डाॅक्टरवर रुग्णाने चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात दोन्ही डाॅक्टरांना दुखापत झाली आहे.
यवतमाळ: येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गुरुवारी रुग्णाने एका निवासी डॉक्टरवर चाकूने हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्याच्या बचावासाठी आलेल्या अन्य एका डॉक्टरवर हल्ला करण्यात आला. या घटनेमुळे परिसरात सध्या तणावाच वातावरण असून त्यानंतर संतप्त डाॅक्टरांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. त्यामुळे इतर रुग्णांचीही गैरसोय झाली.
यवतमाळमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याच काल पहायला मिळालं. रुग्णावर उपचार करीत असलेल्या कनिष्ठ निवासी डाॅक्टरवर रुग्णाने चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात दोन्ही डाॅक्टरांना दुखापत झाली आहे. डाॅ. सॅबिस्टीयन (रा. तामिळनाडू) आणि डाॅ. अभिषेक झा अशी जखमी झालेल्या डॅाक्टरांची नावं आहेत. सध्या जखमी डाॅक्टरांवर उपचार सुरू असून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.