डेल्टा प्लसमुळे रुग्ण गंभीर पण आरोग्यमंत्री म्हणतात काळजीचं कारण नाही ? कारण जाणून घ्या

डेल्टा प्लस विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण अधिक गंभीर होतात मात्र तरीही घाबरण्याचे कारण नाहीये अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी दिली आहे.

  मुंबई : कोरोना रुग्णांची (Corona patients) संख्या राज्यात कमी होत असल्याने अनलॉकला सुरूवात झाली. मात्र कोरोनाच्या डेल्टा प्लस विषाणूने (Delta Plus) पुन्हा एकदा सर्वांची चिंता वाढवली आहे. राज्यात डेल्टा प्लस विषाणूची लागण झालेले २१ रुग्ण महाराष्ट्रात (Delta Plus in Maharashtra) आढळून आले आहेत. डेल्टा प्लस विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण अधिक गंभीर होतात मात्र तरीही घाबरण्याचे कारण नाहीये अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी दिली आहे.

  आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटलं, डेल्टाला डेल्टा प्लस पूर्ण बदल झालेला नाही. आता सॅम्पल सापडले त्यात पेंशट सीरिअस होण्याचे प्रमाण जास्त आहे तरीही घाबरवण्याचे काम नाही. ज्या ठिकाणी डेल्टा प्लस विषाणूचे रुग्ण आढळून आले आहेत तेथे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सांगितले आहे.

  राज्यात कोरोनाच्या डेल्टा प्लस विषाणूचे एकूण २१ रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील ९ रुग्ण रत्नागिरी येथील जळगाव येथील ७ मुंबई -२ आणि पालघर, सिंधुदुर्ग, ठाणे येथील प्रत्येकी १ रुग्ण आहे. या विषाणूच्या तपासणीसाठी राज्यभरातून सुमारे ७५०० नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

  व्हॅक्सिन घेऊन किंवा आधी कोरोना झाला असेल त्यांना पुन्हा कोरोना होतो का याची माहिती घेतली जात आहे. तिसरी लाट कधी येईल हे स्पष्ट सांगता येत नाही. तिसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेता राज्य सरकारने तयारी केली आहे. वैद्यकीय स्तरावर, लहान मुलं यासाठी आयसीयू तयार केले जात आहेत. ऑक्सिजन ३ हजार मेट्रिक टन उपलब्ध करण्याबाबत राज्य शासन प्रयत्न करत आहे.

  आमदार महत्वाचा घटक आहे. तिसरी लाट उंबरठयावर असताना अधिक शहाणपणाने वागलेल बरे, कदाचित त्यामुळे दोन दिवसाचा निर्णय घेतला असेल अशी प्रतिक्रिया आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दोन दिवसीय अधिवेशनावर दिली आहे.

  आशा वर्कर्सच्या मागण्यांबाबत सविस्तर चर्चा झाली. मागण्यांबाबत चर्चा केली. संप मागे घ्यावा अशी विनंती केली पण त्यांनी मान्य केले नाही. वास्तविक संप त्यांनी करायला नको. आठ हजार रूपये प्रति महिना मिळतात त्यांना राज्य सरकारने नवा प्रस्ताव दिला त्यावर तोडगा निघेल अशी अपेक्षा आहे.

  राजावाडी रुग्णालयात रुग्णाचे डोळे उंदराने कुरतडल्याच्या प्रकरणावर आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, अतिशय दुर्दैवी घटना आहे. महापालिका हॉस्पिटल असले तरी अस घडायला नको, राज्याच्या आरोग्य विभागाने ही यावरून खबरदारी घ्यावी.