नांदगावात मुळीकवाडी वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्याचे खडीकरण; खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नांना यश

नांदगाव (ता.कराड) येथील मुळीकवाडी वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाली होती. हा रस्ता मजबूत व्हावा यासाठी खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नांमुळे शासनाच्या २५-१५ योजनेतून या रस्त्याचे मजबुतीकरण, खडीकरणाचे काम सुरू झाले आहे. त्याबद्दल ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

    कराड : नांदगाव (ता.कराड) येथील मुळीकवाडी वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाली होती. हा रस्ता मजबूत व्हावा यासाठी खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नांमुळे शासनाच्या २५-१५ योजनेतून या रस्त्याचे मजबुतीकरण, खडीकरणाचे काम सुरू झाले आहे. त्याबद्दल ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

    ग्रामपंचायत सदस्य प्रशांत विश्वनाथ सुकरे यांनी ज्येष्ठ नेते वि.तु. सुकरे (गुरुजी) यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार श्रीनिवास पाटील यांच्याकडे या रस्त्याचे काम व्हावे म्हणून पाठपुरावा केला होता. त्यानुसार खासदार श्रीनिवास पाटील यांच्या शिफारशीनंतर याला निधी मंजूर झाला असून, प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे.

    दरम्यान, या कामाच्या शुभारंभप्रसंगी माजी ग्रामपंचायत सदस्य मारुती पाटील, सयाजी शिंदे, सतीश कडोले, रणधीर शिंदे, जगन्नाथ पाटील, सुरेश जठार, संपत उमरदंड, अनिल जुजार, दिलीप मोरे, रामचंद्र थोरात, श्रीरंग देसाई, विलास माटेकर, संभाजी पाटील यांच्यासह ग्रामस्थ ठेकेदार शिंदेची उपस्थिती होती.

    नांदगाव पेठ विभागालगत मुळीकवाडी वस्ती परिसरात लोकवस्ती झपाट्याने वाढत आहे. मात्र, याकडे जाणारा रस्ता अत्यंत खराब होता. या रस्त्यावर खासदार पाटील यांच्या पाठपुराव्याने प्रथमच निधी मिळून रस्ता मजबुतीकरणाचे काम प्रत्यक्ष सुरू झाल्याने ग्रामस्थांच्यातून त्यांना धन्यवाद दिले जात आहेत.