पवार, फडणवीस, जरांगे एकाच दिवशी कोल्हापुरात! 

मराठा समाजाच्या आरक्षण लढ्यात केंद्रस्थानी बनलेले मनोज जरांगे पाटील, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकाच दिवशी १७ नोव्हेंबर कोल्हापुरात येत असल्याने या दौऱ्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.

    कोल्हापूर : मराठा समाजाच्या आरक्षण लढ्यात केंद्रस्थानी बनलेले मनोज जरांगे पाटील, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकाच दिवशी १७ नोव्हेंबर कोल्हापुरात येत असल्याने या दौऱ्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.
    अखिल महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संयुक्त महामंडळ यांच्या वतीने जयसिंगपूर येथे ६० वे राज्यस्तरीय शैक्षणिक संमेलन कोल्हापुरात हाेणार आहे. या संमेलनाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर असणार असल्याची माहिती समोर आली आहे. दोघेही एकाच मंचावर येणार असल्याने त्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.
    दुसरीकडे मराठा समाजाच्या आरक्षण मागणीसाठी मनोज जरांगे पाटील महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. १७ नोव्हेंबरला ते कोल्हापूरात आहेत. राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधिस्थळी दर्शन घेऊन सभा घेणार अाहेत. तीन दिग्गज एकाच दिवशी कोल्हापूर दौऱ्यावर असल्याने त्याला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. शिवाय त्या दिवशी पोलिसांची ही धावपळ उडणार असल्याचे चित्र आहे.