‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीआधी आज पवार-ठाकरेंची पत्रकार परिषद, पीसीत ‘हे’ नेते राहणार उपस्थित…

मुंबईतील प्रसिद्ध ग्रँड हयात हॉटेलमध्ये ही बैठक होणार आहे. इंडिया आघाडीतील २६ पक्षांचे नेते या बैठकीसाठी मुंबईत येत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज दुपारी ४ वाजता उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे.

    मुंबई : केंद्रातील भाजपाला रोखण्यासाठी देशातील जवळपास २६ पक्ष एकत्र आले आहेत.  इंडिया आघाडीची मुंबईतील बैठक तोंडावर येऊन ठेपली आहे. ३१ ऑगस्ट व १ सप्टेंबर रोजी इंडिया आघाडीची मुंबईत बैठक होणार आहे. या बैठकीचे आयोजन ठकरे गटाचे प्रमुख उदधव ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. या बैठकीतून पवार-ठाकरे यांची ताकद दिसणार आहे. दरम्यान, आता इंडिया आघाडीला अन्य १३ पक्षांचा पाठिंबा मिळणार असल्यामुळं इंडिया आघाडीला मोठे बळ मिळाले असून, हे १३ पक्ष मुंबईतील बैठकीत दिसणार आहेत. दरम्यान, बैठकीपूर्वी आज शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे पत्रकार परिषद घेणार आहेत. (pawar thackeray press conference today before the meeting of india alliance this leaders will be present)

    पवार-ठाकरेंची पत्रकार परिषद…

    उद्या आणि परवा म्हणजे ३१ ऑगस्ट व १ सप्टेंबर रोजी मुंबईत काँग्रेस प्रणीत ‘इंडिया’ आघाडीची महत्त्वाची बैठक होत आहे. ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडे या बैठकीच्या नियोजनाची जबाबदारी आहे. मुंबईतील प्रसिद्ध ग्रँड हयात हॉटेलमध्ये ही बैठक होणार आहे. इंडिया आघाडीतील २६ पक्षांचे नेते या बैठकीसाठी मुंबईत येत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज दुपारी ४ वाजता उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेतून बैठकी संदर्भात माहिती देण्यात येईल. इंडिया आघाडीची पहिली बैठक बिहार पाटनामध्ये झाली होती. दुसरी बैठक बंगळुरु येथे झाली होती.आता तिसरी बैठक मुंबईत होत आहे. या बैठकीत इंडिया आघाडीचा संयोजकाची निवड होऊ शकते. मल्लिकार्जुन खर्गे यांच नाव संयोजकपदासाठी चर्चेत आहे.

    १३ पक्ष सहभागी होणार
    दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेकाप, माकप, सुराज्य, समाजवादी, बहुजन विकास आघाडी, माकप, भाकप यासह विविध १३ पक्षांनी एकत्र येत राज्यात प्रागतिक विचार मंच या नावाने तिसरी आघाडी स्थापन केली आहे. यातील बहुसंख्य पक्ष ‘इंडिया’ आघाडीत सहभागी झाले आहेत. पूर्ण प्रागतिक मंचच त्यामध्ये सहभागी होणार आहे. याबाबतचा निर्णय लवकरच जाहीर केला जाणार आहे. शेकापचे नेते आमदार जयंत पाटील यांच्या पुढाकाराने तशी महाविकास आघाडीबरोबरच चर्चा सुरू आहे. ही चर्चा सकारात्मक झाल्यास हे १३ पक्ष ‘इंडिया’ आघाडीला पाठिंबा देणार आहेत.