पवार काका-पुतण्यांची लढाई आता थेट मैदानात…, शरद पवारांच्या टिकेला अजित पवार देणार उत्तरसभांमधून प्रतिआव्हान

आज शरद पवारांची येवल्यानंतर बीडमध्ये मोठी जाहीर सभा होत आहे. या सभातून शरद पवार हे अजित पवार गटावर सडकून टिका करणार असल्याची शक्यता आहे. यानंतर शरद पवारांच्या टिकेला जशाच तसे उत्तर देण्यासाठी अजित पवार देखील सभा घेणार आहेत.

    मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसमधून फुटून अजित पवार (Ajit Pawar) गट सत्तेत सहभागी झाल्यानंतर पवार गट व अजित पवार गट यांच्यात तुतु मैमै सुरु आहे. पक्ष आणि चिन्हावर अजित पवार गटाने दावा सांगितला आहे. असे असले तरी शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार यांच्यात गुप्तभेटी होत आहेत. यामुळं शरद पवार यांच्या नेमकी भूमिका काय यावरुन शंका उपस्थित केली जात आहे. या भेटीमुळे महाविकास आघाडीमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. शरद पवारही सत्तेत सहभागी होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दरम्यान, आज शरद पवार हे बीडमध्ये सभा घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचं बोललं जातंय. तर अजित पवार गटाला फोटो न वापरण्याचा इशारा दिला आहे. शरद पवारांच्या टिकेला, अजित पवार उत्तरसभांतून प्रतिआव्हान देणार आहेत. (Pawar uncle-nephew battle is now live in the field…, Ajit Pawar will give a counter challenge to Sharad Pawar’s support in the Uttar Sabha)

    शरद पवारांच्या राज्यभरात सभा

    दरम्यान, “८३ वर्षांचा माणूस युद्ध करायला निघाला आहे. युद्ध करणाऱ्याला वय नसतं. ज्याला तलवार चालवता येते, तो युद्ध करतो. मग तो १६ वर्षांचा मुलगा असो किंवा १०० वर्षांचा तरुण असो. युद्ध करण्यासाठी जिद्द मनात लागते”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. तसेच पवार साहेब राज्यात मंचर, पुणे, कोल्हापूर, रायगड, महाड आणि जळगावात सभा घेणार असल्याची माहिती आमदार जितेंद्र आव्हाडांनी दिली आहे.

    उत्तरसभांतून प्रतिआव्हान…

    आज शरद पवारांची येवल्यानंतर बीडमध्ये मोठी जाहीर सभा होत आहे. या सभातून शरद पवार हे अजित पवार गटावर सडकून टिका करणार असल्याची शक्यता आहे. यानंतर शरद पवारांच्या टिकेला जशाच तसे उत्तर देण्यासाठी अजित पवार देखील सभा घेणार आहेत. शरद पवार भाजपविरोधी भूमिकेवर ठाम राहिले. त्यामुळे आता अजितदादा गटाने शरद पवारांना उत्तरसभांमधून आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी २७ ऑगस्टपासून अजितदादा गटाचे नेते ‘महाराष्ट्र परिक्रमा’ काढणार आहेत. अजितदादा गटाच्या ‘परिक्रमे’ची पहिली सभा याच जिल्ह्यात होण्याची शक्यता आहे. किंवा पहिली सभा पुण्यात होण्याची शक्यता आहे.