50 लाख रुपये दे, नाहीतर…; किरीट सोमय्या यांना अज्ञाताकडून धमकी

भाजप नेते किरीट सोमय्या यांना 50 लाख रुपयांची खंडणी मागितल्याची घटना समोर आली आहे. 50 लाख दे, नाहीतर कथित अश्लिल व्हिडीओ व्हायरल करेल, अशी धमकी अज्ञात व्यक्तीने सोमय्या यांना दिली आहे.

    मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांना 50 लाख रुपयांची खंडणी मागितल्याची घटना समोर आली आहे. 50 लाख दे, नाहीतर कथित अश्लिल व्हिडीओ व्हायरल करेल, अशी धमकी अज्ञात व्यक्तीने सोमय्या यांना दिली आहे.

    याप्रकरणी किरीट सोमय्या यांनी मुंबईतल्या नवघर पोलिसांकडे तक्रार केली आहे. दरम्यान, सोमय्या यांच्या तक्रारीवरून नवघर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध कलम 385 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

    सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, किरीट सोमय्या यांच्या मुंबईतील कार्यालयात एक मेल आला. ज्यामध्ये अज्ञात व्यक्तीने त्यांचा कथित अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली.

    तसेचं आरोपीने किरीट सोमय्या यांच्याकडे 50 लाख रुपये खंडणीचीही मागणी देखील केली. या संपूर्ण प्रकारानंतर किरीट सोमय्या यांनी तातडीने पोलिसांत धाव घेतली. काही दिवसांपूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या यांचा कथित व्हिडीओ समोर आला होता.