एका भरधाव ट्रकच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

म्हाळुंगे गावात एका भरधाव ट्रक चालकाने पादचाऱ्याला ठोकल्याने यामध्ये पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पिंपरी :  म्हाळुंगे गावात एका भरधाव ट्रक चालकाने पादचाऱ्याला ठोकल्याने यामध्ये पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    मयुख शर्मा (वय 40 वर्षे, रा. हावडा, राज्य पश्चिम बंगाल) असे या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत अजित इचके (वय 23 वर्षे, रा. पिंपळे गुरव) यांनी फिर्याद दिली आहे.
    मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक (नं MH24 एफ.टी. 0042) चालक आरोपी रतन खंदारे (वय 57 वर्षे, रा. तरोळा कसाबा, तालुका शेगाव, जिल्हा बुलढाणा) याने निष्काळजीपणे, भरधावपणे ट्रक चालवून पायी चालत जाणाऱ्या मयुख शर्मा यांना ठोकर (Mhalunge Accident)  दिली. या धडकेत शर्मा गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला, असे सहाय्यक पोलिस निरीक्षक गोरख थेऊरकर म्हणाले. दरम्यान, म्हाळुंगे चौकीमध्ये आरोपी विरोधात भा. द. वि. कलम 279, 304(अ) आणि मोटर व्हेइकल अॅक्ट 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.