जयदेव ठाकरेंना डावलून बाळासाहेबांची प्रॉपर्टी हडपणाऱ्या उद्धव ठाकरेंवर जनता विश्वास ठेवत नाही – नितेश राणे

आमदार नितेश राणेंची घणाघाती टीका; लोकसभेनंतर संजय राऊत भावासह एकनाथ शिंदेंकडे असणार

    कणकवली : उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रासमोर आपण किती खोटारडा आहे याचा पुरावाच दिला. २०१९ ला देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री बनवायचे ठरवले होते हेही ठाकरे यांनी सांगून टाकले. जयदेव ठाकरेला विचारा उद्धव ठाकरे किती खोटारडा आहे. बाळासाहेबांची प्रॉपर्टी हडपण्यासाठी जो उद्धव खोटे बोलतो, ज्याला रक्ताची नाती सांभाळता आली नाहीत त्या उध्दववर महाराष्ट्राची जनता विश्वास ठेवत नाही. ज्या आदित्य ठाकरेला मुख्यमंत्री बनवायची भाषा करता, ज्याचे अजून लग्न झाले नाही, मुलाशी की मुलीशी लग्न लावायचे हे अजून ठरत नाही. त्याला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनवणार होते असे सांगणाऱ्या उद्धव ठाकरेच्या केमिकलचा लोचा झाला आहे. मानेचे औषध आता मेंदूत गेले असून उद्धव ठाकरे आता वेडा झाला असल्याची टीका भाजपा प्रवक्ते आमदार नितेश राणेंनी केली.

    कणकवलीत पत्रकार परिषद
    जयदेव ठाकरे यांनी कोर्टात दिलेलं स्टेटमेंट जर इंडियन एक्सप्रेस मध्ये छापले तर जनतेला कळेल की उद्धव ठाकरे हा किती नीच आहे. प्रॉपर्टी हडपण्यासाठी स्वतःच्या वडिलांच्या मृत्यूची तारीख वेळेवर जाहीर करत नाही त्याच्यावर कोणाचाच विश्वास बसणार नाही असेही नितेश राणे म्हणाले.

    लोकसभा निवडणुकीनंतर स्वतः संजय राऊत स्वतःच्या भावाला घेऊन एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत सामील होणार आहे. तारीख आणि स्थळ ठरलेले आहे फक्त ४ जून रोजी निकाल लागल्या नंतर राऊत शिंदेंकडे असतील. पंतप्रधान मोदींना घाम फुटला असे संजय राऊत म्हणाले यावर टीका करताना उद्धव ठाकरे डायपर घालून फिरतो काय असा प्रतिसवाल नितेश राणे यांनी केला. दूरदर्शन मोदींचे मुखपत्र झाल्याच्या टिकेवर सामना हा आता काँग्रेसचे मुखपत्र झाल्याची प्रतिटिका राणे यांनी केली. गळ्यात भगवा घातला म्हणजे कोणी हिंदू होत नाही, आधी मनातील भावना हिंदुवादी ठेवा असा टोला नितेश राणे यांनी लगावला.