आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा बांधव आक्रमक; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक तिरडीवरच अंत्यसंस्कार

मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांना पाठिंबा देण्यासाठी येथे रविवारपासून साखळी उपोषण सुरू केले आहे. तसेच आरक्षण मिळेपर्यंत सर्वपक्षीय नेत्यांना गावबंदीचा निर्णय घेतला आहे.

    कवठेमहांकाळ : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांना पाठिंबा देण्यासाठी येथे रविवारपासून साखळी उपोषण सुरू केले आहे. तसेच आरक्षण मिळेपर्यंत सर्वपक्षीय नेत्यांना गावबंदीचा निर्णय घेतला आहे. अलकूड (एस) फाटा येथे मंगळवारी सकाळी दहा वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. हे साखळी उपोषण सात दिवस सुरू राहणार आहे.

    यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व नारायण राणे यांच्या प्रतिकात्मक तिरडीचे दहन करून निषेध करण्यात आला. शासनाने लवकर निर्णय न घेतल्यास व काही अनुचित घटना घडल्यास त्याला प्रशासन जबाबदार राहील, असेही आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

    शांततेच्या मार्गाने मोठ्या संख्येने मोर्चाद्वारे तहसीलदार यांना निवेदन देण्यात येणार आहे. रांजणी येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन सुरू आहे.